मुंबईसाठी युवराज सिंगवरची बोली ठरली सर्वात मौल्यवान!

जयपूरमध्ये मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 साठी लिलाव पार पडला. या लिलावात अनेक अश्चर्यकारक निर्णय पहायला मिळाले.

या लिलावात युवराज सिंगला दुसऱ्या फेरीत शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सचा संघमालक आकाश अंबानीने बोली लावत संघात घेतले आहे. युवराजला मुंबईने त्याच्या मुळ किंमतीत 1 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

युवराजची ही बोली मुंबईसाठी मागील 11 वर्षातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बोली असल्याचे आणि त्याला मागील अनेक वर्षांपासून संघात घेण्याचा प्रयत्न होता, असे आकाश अंबानीने म्हटले आहे. मुंबईने युवराजबरोबरच श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगालाही त्याच्या मुळ किंमतीवर(2 कोटी) बोली लावत संघात घेतले आहे.

त्यांच्याबद्दल आकाश अंबानी म्हणाला, ‘ प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आम्ही युवराज आणि मलिंगासाठी आणखी रक्कमेची बोली लावण्याची तयारी केली होती. युवराजसारखा खेळाडू 1 कोटीला मिळणे ही आमच्यासाठी 12 वर्षातील मोठी बोली आहे. त्याने आत्तापर्यंत सर्व चषक जिंकले आहेत.’

‘आम्ही अनुभवाबरोबरच युवा खेळाडूंवरही लक्ष केंद्रीत केले होते. आम्ही युवराज आणि मलिंगाची भूमीका ओळखून आहोत.’

युवराजवर या लिलावात पहिल्या फेरीत कोणत्याच संघाने बोली लावली नव्हती. तसेच मागीलवर्षीही किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 2 कोटी या मुळ किंमतीत संघात घेतले होते. पण त्यांनी यावर्षी त्याला लिलावासाठी त्याला मुक्त करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

असे असतील २०१९ च्या आयपीएलसाठी सर्व संघ…

युवराज सिंग झाला मुंबईकर…

भाऊ तुमच आॅरेंज आर्मीत स्वागत, राशिदने केलं या खेळाडूचं खास स्वागत