आयपीएल २०१७चा ‘ईमोजी’ खेळ

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आयपीएलचा बोलबाला चांगलाच रंगला. एकतर १० वे पर्व आणि त्यात अनेक असे खेळाडू जे पुढच्या पर्वात असतील की नाही ही शंका, अश्या अनेक बाबींमुळे हे पर्व रसिकांनी डोक्यावर घेतले. दरवर्षीप्रमाणे या वर्षी अनेक नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. टीमच्या जर्सी असोत किंवा दोन नवीन संघ असोत.

 

त्याच बरोबर आणखीन एक वेगळी पण लोकांना अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या आवडत्या खेळाडूंचे ‘इमोटीकॉन’.

ट्विटरवर आपल्या आवडीच्या खेळाडूचे नाव लिहिल्यावर त्याच्या नावासोबत त्याचे चित्र आपल्याला दिसते. आता आयपीएलचा अंतिम टप्पा जवळ आला आहे, २१ मे रोजी या मोसमाचा अंतिम सामना खेळाला जाणार आहे. त्यासाठी आयपीएलने #IPLFinal असा नवीन इमोटीकॉन काढला आहे. हा नवीन ईमोजी नुकताच आयपीएलने आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेर केला आहे.