आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सकडून ट्रॉफी सिद्धिविनायकाच्या चरणी

अंतिम षटकात मिळवलेल्या थरारक लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभूत करून मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले. काल रात्री हैद्राबाद येथे झालेल्या

विजयच्या जल्लोषानंतर आज सकाळी मुंबई इंडियन्स संघाने मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरास भेट देत ट्रॉफी बाप्पा चरणी अर्पण केली. यावेळी मुंबई ई इंडियन्सचे फ्रॅन्चायझी अनंत अंबानीचे अनंत अंबानी उपस्थित होते.

इंडियन प्रीमिअर लीग च्या १०व्या मोसमाचा अंतिम सामना काल हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियम वर पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने पुण्याला १ धावाने हरवून आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला. मुंबईने आतापर्यंतच्या १० मोसमात सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकण्याचा मान पटकावला आहे.