बेंगलोरच्या हिरव्या रंगाच्या जर्सीतुन दिला जातो ‘पर्यावरण वाचवा’ चा मुख्य संदेश

 

बेंगलोरचा सामना आज त्यांच्या होम ग्राउंड अर्थात बेंगलोरमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात संघातील प्रत्येक खेळाडूने हिरव्या रंगाची जर्सी घातलेली दिसते. यापूर्वीही आपण या संघाने प्रत्येक मोसमातील एखाद्या-दुसऱ्या सामन्यात या संघाने हिरवी जर्सी घातलेली पाहिलं आहे. या हिरव्या जर्सी मागील दुसरं तिसरं कारण काही नसून “पर्यावरण वाचवा” हा मोठा संदेश बेंगलोर टीमला द्यायचा आहे.

याची सुरुवात २०११ सालच्या आयपीएल मोसमपासून झाली. त्यात जागतिक तापमान वाढ संदर्भात जनजागृती करण्यात येते. तसेच वृक्षारोपण संदर्भात कार्य केले जाते.

२०१० च्या मोसमात बेंगलोर महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रेक्षकांना स्टेडियम पर्यंत येण्यासाठी जादा बस सोडण्यात आल्या.
२०११ साली बेंगलोर संघाने एका सामन्यात लाल ऐवजी हिरव्या रंगाची जर्सी घालून याला एक ठोस स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. या संघाने २०१२ साली हिरव्या रंगाच्या खेळाडूंनी घातलेल्या ह्या जर्सीचा लिलाव केला. त्यातून उभे राहिलेले पैसे वृक्षारोपणासाठी वापरण्यात आले. २०१३ च्या आयपीएलमध्ये इंधन वाचवा हा मोठा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. २०१४ साली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठी जनजागृती करण्यात आली. २०१५ साली एम. चिन्नास्वामी मैदान हे सोलर उर्जेवर चालवलं जाणार पाहिलं मैदान बनविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलली गेली. गेल्या मोसमात चाहत्यांना मैदानावर सायकल वर येण्याचे अवाहन करण्यात आले. त्यालाही मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.