ट्विटरची ड्रीम आयपीएल २०१७ टीम…

जसे माजी खेळाडू त्यांची ड्रीम टीम निवडतात तशी ह्या वर्षी आयपीएलची ड्रीम टीम ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटनेही बनवली आहे. त्यात त्यांची मैदानावरील कामगिरी ध्यानात न घेता त्यांची ट्विटरवरील कामगिरी ध्यानात घेण्यात आली. साखळी सामन्यानंतर ही टीम घोषित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आयपीएलच्या १०व्या पर्वात विशेष कामगिरी न करणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीला ट्विपल अर्थात ट्विटर वापरकर्त्यांची पहिली पसंती दिली तर बेन स्टोक्स या एकमेव परदेशी खेळाडूला या ड्रीम संघात स्थान मिळाले आहे.

याबद्दल बोलताना ट्विटरच्या भारत आणि आग्नेय आशियाचे क्रीडा विभागाचे प्रमुख अनिश मदानी म्हणाले, ” ट्विटर ईमोजी वापरून ज्या चाहत्यांनी हे त्यांच्या आवडत्या खेळाडूबद्दल ट्विट केले ते आणि ज्या खेळाडूला जास्त वेळा मेन्शन केले ते असे एकत्र मिळून ही संघ निवड करण्यात आली आहे. भारताच्या स्टार खेळाडू विराटने त्यात बाजी मारली आहे. आता प्ले ऑफचे सामने बाकी आहेत. पाहूया त्यातून काय पुढे येतंय.”

ट्विटरची ड्रीम आयपीएल २०१७ टीम…
विराट कोहली, गौतम गंभीर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, बेन स्ट्रोक्स, युवराज सिंग, एमएस धोनी, हरभजन सिंग, उमेश यादव, झहीर खान