डब्लूडब्लूइ सुपरस्टार ट्रीपल एचने दिल्या मुंबई इंडियन्सना शुभेच्छा!

क्रिकेट हा भारतात आता एक धर्म झाला आहे. भारतात तर या धर्मासाठी सचिन तेंडुलकर नावाचा देव पण आहे. आयपीएल टी२० स्पर्धेनेही भारतातच नाही तर जगभरात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. जोस बटलेरने आपला नग्न विडिओ ट्विटर टाकला आणि मुंबई इंडियन्सला शुभेच्छा दिल्या. आता आणखीन एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने मुंबई इंडियन्सला शुभेच्छा दिल्या आहेत, पण हा खेळाडू क्रिकेटर नसून माजी डब्लूडब्लूइ सुपरस्टार ट्रीपल एच आहे.

ट्रिपल एचने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे, “हार्दिक शुभेच्या मुंबई इंडियास डब्लू डब्लू इ कडे तुमच्यासाठी काही तरी खास आहे”.

याचा अर्थ असा होता की डब्लूडब्लूइच्या बेल्टच्या बाजूला मुंबई इंडियन्सचा लॉग लावण्यात येणार आहे. डब्लूडब्लू इच्या बेल्टच्या बाजूला परंपरेनुसार विजेत्याच नाव लावण्यात येते, तेथे आता मुंबई इंडिअन्सचे नाव लावलेला बेल्ट ट्रिपल एच मुंबई इंडिअन्सला भेट देणार आहे असे दिसून येत आहे.


२०१७ मध्येच ट्रिपल एचने चेलसा या फुटबॉल क्लबला ही असाच बेल्ट भेट म्हणून दिला होता आणि त्याने २०१६ मध्ये एनबीए क्लीव्लॅंड कावलीयर्स या क्लबला हि अश्याच प्रकारचा बेल्ट भेट दिला होता.