IPL2018- भारतानंतर या देशाचे आयपीएलवर वर्चस्व!

आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात होणार आहे. शेषराव वानखेडे स्टेडीअम, मुंबई येथे आज उद्धाटन समारंभानंतर एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स या संघात सलामीचा सामना होणार आहे. 

या आयपीएलमध्ये ८ संघातून एकूण १८५ खेळाडू खेळणार असून त्यात भारताचे एकूण १२५ खेळाडू भाग घेणार आहेत. प्रत्येक संघात सरासरी १५ भारतीय खेळाडू खेळणार आहेत. त्यात दिल्लीचे आणि पंजाब १२ खेळाडू खेळणार आहेत. 

एकूण ६० परदेशी खेळाडूंमध्ये सर्वात जास्त खेळाडू हे आॅस्ट्रेलियाचे आहेत. तब्बल १४ आॅस्ट्रेलियन खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. 

अनेक खेळाडू दुखापत किंवा अन्य कारणामुळे स्पर्धेबाहेर गेले आहेत आणि स्पर्धा सुरू झाल्यावरही ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.