आयपीएल २०१८: कोहलीचा संघ पहिल्या विजयासाठी उत्सुक

0 251

बंगळुरू। आज आयपीएल २०१८ मधील आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात होणार आहे. हा सामना आज रात्री ८ वाजता सुरु होईल.

हा सामना बंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे बंगलोर संघ या मोसमात पहिल्यांदाच घराच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघ घरच्या मैदानावर विजय मिळवण्यास उत्सुक असतील.

at banglore stadium matches win by bat first - आयपीएल २०१८: कोहलीचा संघ पहिल्या विजयासाठी उत्सुक
सौजन्य: अल्फा प्रेडिकशन्स

त्यांना मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ विकेट्सने पराभूत केले होते. या सामन्यात ब्रेंडन मॅक्युलम आणि एबी डिव्हिलियर्सने आक्रमक फलंदाजी केली होती मात्र बाकी फलंदाजांना विशेष काही करता आले नव्हते. तसेच गोलंदाजांनाही धावांचा बचाव करण्यात अपयश आले होते.

त्याचबरोबर किंग्स इलेव्हन पंजाब संघाने पहिल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल. तसेच या सामन्यात पंजाबचा फलंदाज के एल राहुलने आयपीएल इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक केले होते. त्यामुळे त्याच्यावर आजच्या सामन्यातही लक्ष राहील.

आर अश्विन कर्णधार असणाऱ्या पंजाब संघाला हीच विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. तसेच पंजाब संघात ऍरॉन फिंच उपलब्ध असणार आहे. मागील सामन्यात तो त्याच्या लग्नामुळे उपस्थित नव्हता.

banglore innning 1 2 scores - आयपीएल २०१८: कोहलीचा संघ पहिल्या विजयासाठी उत्सुक
सौजन्य: अल्फा प्रेडिकशन्स

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना?
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आजचा सामना एम चिदंबरम स्टेडियम, बंगळुरू येथे होईल. तसेच या मैदानावर बंगलोर संघाचे सर्व घरचे सामने होणार आहेत.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामना?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर:
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, सर्फराज खान, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोम, ख्रिस वोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, उमेश यादव,युजवेंद्र चहल, मनन वोहरा, कुलवंत खजुरिलिया, अनिकेत चौधरी, नवदीप सैनी,पार्थिव पटेल,टीम साऊथी,एम अश्विन, मोहम्मद सिराज, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, पावन नेगी, पावन देशपांडे, अनिरुद्ध जोशी

किंग्स इलेव्हन पंजाब:
अक्षर पटेल, युवराज सिंग,आर अश्विन,करूण नायर, के एल राहुल,ऍरॉन फिंच,डेव्हिड मिलर, मार्कस स्टोयनीस, मयांक अग्रवाल,अंकित राजपूत, मनोज तिवारी, ख्रिस गेल,मोहित शर्मा,मुजीब जदरां, बरिंदरसिंग स्रान, अँड्रयू टाय, बेन द्वारशुईस, परदीप साहू, अक्षरदीप नाथ, मयंक डागर, मंझूर दर

rcb vs kxip at banglore stadium matches win by - आयपीएल २०१८: कोहलीचा संघ पहिल्या विजयासाठी उत्सुक
सौजन्य: अल्फा प्रेडिकशन्स
Comments
Loading...
%d bloggers like this: