आयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं!

दक्षिण अफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डी विलियर्स मैदानात चहूबाजुंनी फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो, म्हणूनच त्याला ‘मिस्टर 360’ असे म्हटले जाते. त्याच्या अशाच फटकेबाजीचा आनंद काल चाहत्यांनी घेतला.

काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात बेंगलोरकडून खेळताना डी विलियर्सने 30 चेंडूत 68 धावा केल्या. यात त्याने 9 षटकार आणि 2 चौकार मारले.

त्याच्या या खेळीतील एक षटकार तर तब्बल 111 मीटरचा होता. त्याचा हा षटकार आयपीएल 2018 मधील आत्तापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठरला आहे. त्याने हा षटकार 11 व्या षटकात इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर मारला.

याआधीही आयपीएल 2018 मधील आत्तापर्यंतचा सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम डी विलियर्सच्याच नावावर होता. त्याने दिल्ली डेयरडेविल्स विरूद्ध 106 मीटरचा षटकार मारला होता.

या बरोबरच आयपीएल 2018 मध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीतही डी विलियर्सच 23 षटकारांसह अव्वल स्थानी आहे. या यादीत त्याच्यापाठोपाठ ख्रिस गेल(21 षटकार) दुसऱ्या आणि आंद्रे रसेल(19 षटकार) तीसऱ्या स्थानावर आहे.

काल झालेल्या सामन्यात चेन्नईने बेंगलोरवर 5 विकेट्सने विजय मिळवला.

Video-

महत्त्वाच्या बातम्या –

-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप 

-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने 

-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची 

-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी 

-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड 

-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला

-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला 

-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान