Maha Sports
India's Only Marathi Sports News Magazine

जर ही पात्रता असेल तर होते मुंबई इंडियन्समध्ये निवड

0 491

मुंबई इंडियनचे टीए शेखर यांनी मुंबई इंडियन्समध्ये खेळाडूंची निवड होण्याची पात्रता सांगितली आहे. त्यांनी खेळाडूंकडून संघाला असलेल्या अपेक्षा यावेळी स्पष्ट केल्या आहेत.

स्पोर्ट्सस्टारशी बोलताना ते म्हणाले, ” आम्ही असे गोलंदाज पाहत आहोत जे पॉवरप्ले आणि डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतात. तो जर फिरकी गोलंदाज असेल तर त्याने पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करायला हवी. “

शेखर हे १०व्या मोसमापर्यंत दिल्लीच्या योजना आखण्यात आघाडीवर होते. त्यांनी ह्यावर्षी पुन्हा मुंबई इंडियनकडे परतत मुंबई इंडियन्सचा संघ नव्याने बांधण्याची जबाबदारी घेतली आहे.

“जर एखादा फलंदाज सलामीवीर असेल तर तो वेगवान गोलंदाजांना कस खेळतो, तो लगेच चेंडू तडकावतो किंवा खूप चेंडू तसेच खेळून काढतोय हे पण आम्ही विचारात घेत आहोत. तो जर मधल्या फळीत खेळत असेल तर तो स्ट्राइक कशी दुसऱ्या फलंदाजाला देतो हे महत्वाचे आहे. आम्ही असाही फलंदाज पाहत आहोत जो शेवटच्या ४ षटकांत चौकार, षटकार मारू शकतो. “

“वेगवान गोलंदाजाकडे विविधता असावी. शिवाय त्या विविधतेचा त्याला योग्य वापर करता यायला हवा. ” असेही ते पुढे म्हणाले.

आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटवर भाष्य करताना ते म्हणाले, ” हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. जो खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलं खेळतो तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकेल असं नाही. आयपीएलमध्ये दबाव खूप असतो. “

शेखर हे सध्या सुरु असलेल्या सईद मुश्ताक अली टी२०च्या विविध सामन्यांना हजेरी लावत आहेत. यापूर्वी मुंबईकडून असे करताना जॉन राईट दिसले होते. यामधूनच ते चांगले खेळाडू आयपीएल संघासाठी निवडतात.

Comments
Loading...
%d bloggers like this: