अंपायरचं गणित चुकलं, एकाच षटकात गोलंदाजाला टाकायला लावले ७ चेंडू!

हैद्राबाद | वाद आणि राजस्थान राॅयल्स यांचे नाते काही खास. तब्बल दोन वर्षांच्या बंदीनंतर काल पहिला सामना खेळलेल्या राजस्थान राॅयल्सच्या पहिल्याच सामन्यात वाद झाला. परंतू या वादाला कारणीभूत ठरले ते पंच. 

राजस्थान राॅयल्सचा बेन लाफ्लिन जेव्हा १२षटकात गोलंदाजी करत होता तेव्हा त्याला पंचांनी चक्क ७ चेंडू गोलंदाजी करायला लावली, विशेष म्हणजे त्याने टाकलेले सर्व ६ चेंडू वैध असूनही त्याला ७वा चेंडू टाकायला लावला. 

जेव्हा हा सगळा प्रकार झाला तेव्हा समालोचकांनाही काय झाले ते समजले नाही. तर याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने तोपर्यंत षटक संपले असे समजून जाहिरातही सुरू केली होती. 

या स्पर्धेत एकच गोष्ट चांगली घडली ती म्हणजे हा सामना अटातटीचा झाला नाही, नाहीतर मोठा वाद निर्माण झाला असता.  

असे होते ते षटक- 

 

पहिला चेंडू- निर्धाव
दुसरा चेंडू- १ धाव
तिसरा चेंडू- निर्धाव
चौथा चेंडू- १ धाव
पाचवा चेंडू- १ धाव
सहावा चेंडू- चौकार
सातवा चेंडू- १ धाव