बेंगलोर शहरातील कॅफेनेही केले कोहलीच्या आरसीबीला ट्रोल

कर्नाटक| रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ आणि त्यांचे चाहते यावर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यासाठी खूप उत्साहीत आहे. त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की त्यांच्या चाहत्यांनी ‘ इ साला कप नामदे’ याचा अर्थ ‘यावर्षी विजेतेपद आमचेच’ अशी टॅगलाईन तयार केली आहे. ह्या टॅगलाईनने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

सोशल मीडिया बरोबरच कर्नाटकामधील हर्षा कॅफेने पण या टॅगलाईनचा वापर आपल्या बिलावर केला आहे. व्यवसायामध्ये प्रसिध्दी मिळवण्यासाठी या कॅफेने असे केले आहे.

मात्र सध्याच्या मोसमातील बेंगलोरची कमगिरी बघता या कॅफेने टॅगलाईन बदलली आहे. तसेच या टॅगलाईने संघाची खिल्ली उडवली जात आहे.

कर्नाटकामधील व्हीव्हीरोडवर कॅफे मंद्य हा कॅफे आहे. कदाचित या कॅफेच्या मालकाला कळून चुकले म्हणून त्याने ‘नेक्स्ट साला कप नाम दे’ याचा अर्थ ‘पुढच्या वर्षीचे विजेतेपद आमचेच’ अशी टॅगलाईन बदलली आहे.

कॅफेने बदलेल्या या टॅगलाईने तर ट्रोल करणाऱ्यांच्या संख्येत एकप्रकारे भरच पडली आहे. कॅफेमधील 7 एप्रिलचे आणि 30 एप्रिलचे बिल यात घडलेला बदल दाखवत आहे.

बेंगलोर 8 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. मागच्या वर्षीही त्यांची अशीच अवस्था होती. तरीही कर्णधार विराट कोहलीने विजयाची आशा कायम ठेवली आहे.

कालच झालेल्या मुंबई विरूध्दच्या सामना 14 धावांनी जिंकत या मोसमातील 3रा विजय नोंदवला.

महत्त्वाच्या बातम्या –

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पुढे ढकलली

आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?

Video- चक्क स्टेडियमच्या बाजूला क्रेन उभे करून त्या फूटबाॅल वेड्याने घेतला सामन्याचा आनंद

अबब! विंबल्डनच्या बक्षिसांची रक्कम २०१८मध्ये तब्बल ३०० कोटी

पराभूत होऊनही मुंबईच्या हार्दिक पंड्या जिंकली सर्वांची मने