धोनीचा एकवेळचा कर्णधारच झाला धोनीचा गुरू

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी ज्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली देशांतर्गत क्रिकेट खेळला तोच खेळाडू आता धोनी कर्णधार असलेल्या संघाचा क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक बनला आहे. 

दोन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आज क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून राजीव कुमार या खेळाडूचा निवड केली आहे. धोनीने जेव्हा भारताकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली नव्हती तेव्हा राजीव कुमार हा बिहार आणि झारखंडचा कर्णधार होता. 

४१ वर्षीय राजीव कुमार हा माजी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक प्रशिक्षक स्टीव रिक्सन यांची जागा घेणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून स्टीफन फ्लेमिंग असून एल. बालाजी, माईक हसी, लक्ष्मी नारायण हे अन्य दिग्गज या चमूत असणार आहे. 

राजीव कुमारने २ दिवसांपुर्वीच चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंसोबत सराव सुरू केला आहे आणि काही खास गोष्टींचे प्रशिक्षण दिले आहे. 

त्याने यापुर्वी इंग्लंड देशात प्रशिक्षक म्हणून काम पाहीले आहे. तसेच त्याने झारखंडचे गेल्या मोसमात तर इंडिया ब्लूचे देवधर ट्राॅफीमध्ये प्रशिक्षकपद सांभाळले आहे.