IPL 2018: दोन विकेटकीपर कर्णधारांचे संघ भिडणार आज चेन्नईमध्ये!

आयपीएलच्या ११ व्या मोसमात आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्याला आज रात्री ८ वाजता सुरुवात होईल.

सुमारे दोन वर्षानंतर चेन्नई घरच्या मैदानावर खेळणार आहे. तसेच चेन्नईला आपल्या चाहत्यांसमोर कोलकाता नाईट रायडर्सवर वर्चस्व ठेवायला नक्कीच आवडेल. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात चेन्नईने अखेरच्या क्षणी मुंबईवर १ विकेटने मात केली होती.

मे 2015 नंतर पहिल्यांदाच ‘मेन इन यलो’ एम ए चिदंबरम स्टेडीयमवर खेळणार आहेत. तर सिएसकेच्या चाहत्यांसाठी ही खूप आंनदाची गोष्ट असुन ते खुप मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या सराव सामन्यासाठी पण 10,000 लोक उपस्थित होते.

दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताकडून सुनील नारायणने शानदार अर्धशतक करून विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती.तसेच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत असलेल्या दिनेश कार्तिकनेही चांगली कामगिरी करताना नाबाद ३५ धावा केल्या होत्या.

तसेच आपापल्या संघाना विजय मिळवून देणारे अष्टपैलू खेळाडू चेन्नईचा ड्वेन ब्राव्हो आणि कोलकाताचा सुनील नारायण यांमध्ये कोण सरस हे आज कळेल.   

विशेष म्हणजे या दोन्ही संघाचे कर्णधार हे यष्टिरक्षक सुध्दा आहेत.

त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कधी होईल आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा पाचवा सामना आज, 10 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  यांच्यातील सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना एम ए चिदम्बरम्  स्टेडियम, चेन्नई येथे होईल. तसेच या मैदानावरच चेन्नईचे सर्व घरचे सामने होणार आहेत.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स   सामना?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

चेन्नई सुपर किंग्स : शेन वॉटसन, अंबाती रायडू, सुरेश रैना, एम एस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो,  रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, दीपक चाहर, इम्रान ताहीर, मार्क वूड, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, फाफ डू प्सेसिस, केएम असिफ, लुंगी नगिडी, जगदिसन नारायण, मिशेल सॅन्टनर, कनिष्क सेठ, धृव शौर्य, एम विजय, सॅन बिलींग्ज, क्षितीझ शर्मा, मोनू सिंग, चैतन्य बिश्नोई

कोलकाता नाईट रायडर्स : रॉबीन उथप्पा, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लीन, पियुष चावला, कुलदिप यादव, मिशेल जॉन्सन, शुभम गील, इशांक जग्गी, कमलेश नागरकोती, नितीश राणा, विनय कुमार, अपुर्व वानखाडे, रिंकू सिंग, शिवम मवी, जॅवोन सर्लस, कॅमरॉन डेलपोर्ट