IPL 2018: आज पुण्यात रंगणार चेन्नई विरूद्ध राजस्थान सामना

पुणे। आज पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा सामना होणार आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरवात होईल. 

हा चेन्नईचा चौथा तर राजस्थानचा पाचवा सामना आहे. याआधी चेन्नईने पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळवला आहे. पण त्यांना मागच्या सामन्यात किंग्ज ईलेव्हन पंजाब विरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

तसेच राजस्थानने 4 सामन्यांपैकी दिल्ली डेयरडेविल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध विजय मिळवला आहे, तर सनरायजर्स हैद्राबाद आणि कोलकता नाईट रायडर्स विरूद्ध पराभव स्विकारला आहे. 

हे दोन्ही संघ त्यांच्या मागच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे आजच्या सामन्यातुन विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर चेन्नई पहिल्यांदाच घरचे मैदान म्हणुन पुण्यात खेळणार आहे. 

मागच्या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर असलेला चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना आजच्या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे. तसेच मागच्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या एमएस धोनीवरही आज सर्वांचे लक्ष असेल. 

याबरोबरच मागच्या वर्षी पुण्याच्या संघातुन खेळलेले अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट हे खेळाडू यावर्षी राजस्थानमध्ये असल्याने त्यांना याचा फायदा होऊ शकतो. 

 

 

 

 

 

 

 

 

 

तसेच चेन्नईचा कर्णधार धोनीही मागच्या वर्षी पुण्याच्या संघातुन खेळला आहे. त्यामुळे त्याला पुण्याच्या मैदानाची चांगली जाण आहे. 

आज पुण्याच्या मैदानात चेन्नईहून विसलपोडू एक्सप्रेसने चेन्नई सुपर किंग्जला पाठींबा देण्यासाठी पुण्यात आलेल्या चाहत्यांचा उत्साह पहायला मिळणार आहे. 

कधी होईल आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा 17वा सामना आज, 20 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसीएशन, गहुंजे स्टेडियम येथे होईल.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामना?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

चेन्नई सुपर किंग्ज: एम एस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, फाफ डू प्लेसिस, ड्वेन ब्रावो, केदार जाधव,शेन वॉटसन, आंबती रायडू, इम्रान ताहीर,कर्ण शर्मा,एन जगदीसन, मुरली विजय,सॅम बिलिंग्स, शार्दूल ठाकूर, लुंगी एन्गिडी,मोनू सिंग कुमार, केएम असिफ, मार्क वूड, दीपक चाहर, कनिष्क सेठ, ध्रुव शोरे, क्षितिज शर्मा,चैतन्य बिष्णोई

राजस्थान रॉयल्स: अजिंक्य राहणे (कर्णधार), बेन स्टोक्स,स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, डार्सी शॉर्ट, जोफ्रा आर्चर,प्रशांत चोप्रा , कृष्णप्पा गॉथम, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, अनुरीत सिंग, बेन लाफ्लिन, दुशमंथा चामीरा , अंकित शर्मा, अर्यमान बिर्ला , श्रेयश गोपाळ, सुधेसन मिधून, महिपाल लोमरोर, जतीन सक्सेना, हेनरीच क्लासेन

महत्त्वाच्या बातम्या –