आयपीएल 2018: दिल्लीचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

कोलकता| आज आयपीएल 2018 चा 13 वा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेयरडेविल्स संघात होणार आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या दोन्ही संघांचा हा यावर्षीच्या मोसमातील चौथा सामना आहे. आधीच्या तीन सामन्यांपैकी कोलकाताने पहिल्या सामन्यात बँगलोरवर 4 विकेट्सने मात करून विजयी सुरूवात केली होती. मात्र नंतरच्या दोन सामन्यात  त्यांना लागोपाठ चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैद्राबादकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

तर दिल्लीने सुरवातीच्या दोन सामन्यात पराभव स्वीकारले आहे. मात्र त्यानंतर मुंबई विरूध्दच्या सामन्यात उत्कृष्ठ फलंदाजी करत विजय मिळवला होता.

त्यामुळे या सामन्यातून कोलकता विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. तसेच दिल्लीचा विजयी लय कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल.

असे आहेत 11 जणांचे संघ:

कोलकता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार),  रॉबीन उथप्पा, आंद्रे रसेल, ख्रिस लीन, पियुष चावला, कुलदिप यादव, शुभम गील, नितीश राणा,  शिवम मवी, सुनील नारायण, टॉम कुरेन

दिल्ली डेअरडेविल्स : गौतम गंभीर (कर्णधार), रिषभ पंत, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल,  शहाबाज नदीम, विजय शंकर, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, जेसन रॉय,  ख्रिस मॉरीस, राहूल टेवातिया