IPL 2018: दिल्लीसाठी आज करो या मरो ?

दिल्ली। आज आयपीएलमध्ये 32 वा सामना दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना होणार आहे. हा सामना आज रात्री 8 वाजता सुरु होणार असून दिल्लीच्या घरच्या मैदानावर होणार आहे. 

हे दोन्ही संघ सध्या आयपीएलमध्ये आव्हान कायम ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. दिल्लीचे आत्तापर्यंत या मोसमात 8 सामने झाले असून त्यांना त्यातील दोनच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत.

तर राजस्थानची परिस्थिती दिल्लीपेक्षा बरी असली तरी त्यांनाही आत्तापर्यंत या मोसमात झालेल्या त्यांच्या 7 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ते 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहेत.

दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. परंतू त्यांना बाकी खेळाडूंकडून योग्य साथ मिळीलेली नाही. दिल्लीने आत्तापर्यंत केलेल्या धावांमध्ये 46 %  अय्यर आणि पंतचा हातभार आहे.

गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट त्यांच्यासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 8 सामन्यात 24.90 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ राहुल तेवतियाने 6 विकेट घेतल्या आहेत.

याबरोबरच अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्मही सध्या दिल्लीची डोकेदुखी ठरत आहे.

तसेच राजस्थानकडून फलंदाजीत अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली आहे. तसेच आत्तापर्यंत दोनच सामन्यात संधी मिळालेल्या जोफ्रा आर्चरने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करताना दोन्ही सामन्यात प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत.

परंतू राजस्थानने सर्वाधिक बोली लावलेल्या बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, जाॅस बटलर यांना अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही.

त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण आता स्पर्धा अशा स्थितीत आली आहे जिथून या दोन्ही संघाना एक पराभवही महागात पडू शकतो.

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत राजस्थान आणि दिल्लीमध्ये 17 सामने झाले आहेत. यात दिल्लीने 6 वेळा तर राजस्थानने 11 वेळा बाजी मारली आहे.

कधी होईल आयपीएल 2018 मधील  दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना?
दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये आयपीएल 2018 चा 32वा सामना आज, 2 मेला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल 2018 मधील दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना?
दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना फिरोजशहा कोटला स्टेडियम, दिल्ली येथे होईल.

किती वाजता सुरु होणार आयपीएल 2018 मधील दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना?
आयपीएल 2018 मधील दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना आज रात्री 8.00 वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री 7.30 वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल 2018 मधील दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल 2018 मधील दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी , स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल 2018 मधील दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल 2018 मधील दिल्ली डेयरडेविल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

दिल्ली डेअरडेविल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, अवेश खान, रिषभ पंत, गौतम गंभीर, ग्लेन मॅक्सवेल, अमित शर्मा, शहाबाज नदीम, विजय शंकर, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, जेसन रॉय, डॅन ख्रिस्टन, कॉलिन मुन्रो, नमन ओझा, ख्रिस मॉरीस, राहूल तेवतिया, हर्षल पटेल, पृथ्वी शॉ, जयंत यादव, संदीप लामिचाने, मन्जोत कालरा, लियाम प्लकेंट.

राजस्थान रॉयल्स: अजिंक्य राहणे (कर्णधार), बेन स्टोक्स,स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, डार्सी शॉर्ट, जोफ्रा आर्चर, प्रशांत चोप्रा , कृष्णप्पा गॉथम, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, अनुरीत सिंग, बेन लाफ्लिन, दुशमंथा चामीरा , अंकित शर्मा, अर्यमान बिर्ला , श्रेयश गोपाळ, सुधेसन मिधून, महिपाल लोमरोर, जतीन सक्सेना, हेनरीच क्लासेन

 

महत्त्वाच्या बातम्या –

मलिंगाला श्रीलंकाकडून खेळण्यापेक्षा मुंबई इंडियन्स प्रिय

धोनीच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च ऐकूण थक्क व्हाल!

Video- कोहली फॅन्सकडून सचिनच्या चाहत्यांना जोरदार प्रतित्तोर

डेविड वॉर्नरला दुसरी संधी मिळायलाच हवी

भारताला पाठीमागे टाकत इंग्लड आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल