घरच्या मैदानावर दिल्ली किंग्ज इलेवन पंजाबचा सामना करण्यास सज्ज

दिल्ली। आजचा आयपीएलमधील सामना दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघानी प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत.

दिल्लीचा घरच्या मैदानावर हा पहिलाच सामना आहे. त्यांनी आत्तापर्यंत 5 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. मागील बेंगलोर विरूध्दच्या सामन्यात 174 एवढ्या धावांचे लक्ष्य देऊनसुध्दा या एबी डिवीलिअर्सने (39 चेडूंत 90 धावा) त्यांचा अपेक्षाभंग केला होता.

दिल्लीची फलंदाजी मजबूत तर  गोलंदाजीत निराशा होत आहे. ख्रिस मॉरीस आणि मोहम्मद शमी हे संघातील उत्कृष्ठ गोलंदाज आहेत तरी हे फक्त 6 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरले आहेत. तसेच प्रत्येक षटकात 10.31 च्या सरासरीने धावा दिल्या आहे.

 

 

 

 

 

 

 

पंजाबकडून आर अश्विनने नेतृत्वामध्ये चुणूक दाखवली आहे. पंजाब 5 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मागच्या तीन सामन्यात त्यांनी चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या बलाढ्य संघांना धूळ चारली आहे.

फलंदाजीत ख्रिस गेल आणि के एल राहूल ह्या दोघांनी आत्तापर्यंत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. तर मधल्या फळीत मंयक अग्रवाल आणि करूण नायर हे योग्य साथ देत आहेत.

गोलंदाजीत अॅड्रे टाय याने 8.25 या इकोनॉमी रेटने 7 विकेट्स घेतल्या तर या संघातील भारतीय गोलंदाजांनी प्रत्येक षटकात 10.39 च्या सरासरीने धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या आहेत.

दिल्लीकडे  फलंदाजीत रिषभ पंत,जेसन रॉय आणि  ग्लेन मॅक्सवेल तर  पंजाबकडे ख्रिस गेल आणि के एल राहूल आहेत.

तसेच दिल्ली गुणतालिकेत एक सामना जिंकून 2 गुणांसह सर्वात शेवटी आहे. जर दिल्लीला या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आजचा सामना जिंकणे महत्वाचे आहे.

कधी होईल आयपीएल २०१८ मधील  दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब सामना?
दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा बाविसावा सामना आज, 23 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब यांच्यातील सामना?
दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब यांच्यातील आजचा सामना फिरोजशहा कोटला स्टेडियम, दिल्ली येथे होईल. तसेच या मैदानावरच दिल्ली सर्व घरचे सामने होणार आहेत.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब सामना?
आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब  सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील राजस्थान दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील दिल्ली डेअरडेविल्स विरूध्द किंग्ज इलेवन पंजाब सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

दिल्ली डेअरडेविल्स : गौतम गंभीर (कर्णधार), अभिषेक शर्मा, अवेश खान, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, अमित शर्मा, शहाबाज नदीम, विजय शंकर, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, जेसन रॉय, डॅन ख्रिस्टन, कॉलिन मुन्रो, नमन ओझा, ख्रिस मॉरीस, राहूल टेवातिया, हर्षल पटेल, पृथ्वी शॉ, जयंत यादव, संदीप लामिचाने, मन्जोत कालरा

किंग्ज इलेवन पंजाब: आर अश्विन ( कर्णधार ), ख्रिस गेल , के एल राहूल , अॅरोन फिंच, मंयक अग्रवाल,युवराज सिंग, करूण नायर, मोहित शर्मा, बरिंदग स्रान, मुजिब अर रहमान, अॅड्रे टाय, अक्षदिप नाथ, मंयक दागर, बेन द्वारशूईस, मंजूर दार, डेविड मिलर, अक्षर पटेल, अंकीत राजपूत, प्रदिप साहू, मार्कस स्टोनिस, मनोज तिवारी