IPL 2018: दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने केले या खेळाडूंना कायम

आज आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी कोणते संघ त्यांच्या कोणत्या खेळाडूंना कायम करणार हे जाहीर करणार आहेत. यासाठी मुंबईत एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे. आयपीएल मधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने तीन खेळाडूंना संघात कायम केले आहे.

यात त्यांनी भारताचे नवोदित तरुण खेळाडू श्रेयश अय्यर, रिषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिस या तिघांना संघात कायम केले आहे. याबद्दलची त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

दिल्लीला आता मुख्य लिलावाच्या वेळी दोन राईट टू मॅच कार्ड वापरता येणार आहेत. त्यामुळे ते त्यांच्या आणखी दोन खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात. आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव २७ आणि २८ जानेवारीला होणार आहे.