जुने दिवस परतले, आयपीएल पहा आता थेट आपल्या दूरदर्शनवर

इंडियन प्रिमीयर लीगचे प्रक्षेपण आता दूरदर्शन वाहिनीवरुन होणार आहे. ७ एप्रिलला सुरु होणाऱ्या या क्रिकेटच्या कुंभमेळ्याचे प्रसारण करण्यासाठी स्टार स्पोर्ट्सने दूरदर्शनला परवानगी दिली आहे. 

यात आयपीएल उद्घाटन समारंभ, आयपीएलची सांगता हे दोन समारंभ तसेच आठवड्यात एक सामना अशा प्रकारे हे प्रसारण होणार आहे. तसेच अंतिम सामना, काॅलिफायर १, एलिमिनेटर, काॅलिफायर १ हे सामनेही दाखवले जाणार आहेत. 

परंतु हे सामने १ तास उशीराने दूरदर्शनवर प्रसारित केले जाणार आहेत. यात जाहिरातीमधून येणारे उत्पन्न स्टार आणि दुरदर्शनमध्ये ५०-५०% असे विभागले जाणार आहे. 

स्टार इंडियाने या स्पर्धेच्या ५ मोसमाच्या प्रसारणाचे हक्क तब्बल १६,३४७.५ कोटी एवढी मोठी रक्कम  देऊन विकत घेतले आहेत. 

हे सर्व सामने डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर दिसणार आहेत. 

दूरदर्शनवर कोणते सामने पहायला मिळणार- 

१. अंतिम सामना, काॅलिफायर १, एलिमिनेटर, काॅलिफायर १ 

२. दर रविवारी एक सामना

३. आयपीएल उद्घाटन समारंभ, आयपीएल सांगता समारंभ

४. काही सामन्यांच्या हायलाईट्स