आयपीएलमधून या देशाचे ४ दिग्गज खेळाडू मायदेशी परतणार!

 मुंबई | आयपीएल २०१८मध्ये जवळपास सर्वच संघ हे आता १० सामने खेळले आहेत. साखळी फेरीतील आता केवळ ४ सामने बाकी आहेत.

अशा वेळी इंग्लड देशातील खेळाडूंना इंग्लड क्रिकेट बोर्डाने मायदेशी परतण्यास सांगितले आहे.

२४मे पासुन पाकिस्तानचा इंग्लंड दौरा सुरू होत आहे. यात ते दोन कसोटी सामने खेळणार आहे. सध्या इंग्लंड कसोटी संघातील चार खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत.

Read- अल्बम: कोहलीसह बेंगलोरच्या खेळाडूंनी मारला सिराजच्या घरी बिर्याणीवर ताव

त्यामुळे या दौऱ्याच्या तयारीचा भाग म्हणुन त्यांना आयपीएल अर्ध्यात सोडून मायदेशी परतावे लागणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना २४मे तर दुसरा १ जून रोजी होणार आहे.

बेंगलोरकडून खेळणारे मोईन अली आणि ख्रिस वोक्स, चेन्नईकडून खेळणारा मार्क वूड आणि राजस्थानकडून खेळणारा बेन स्टोक्स हे ते चार खेळाडू आहेत.

Read- मुंबईकरांसाठी आजचा दिवस ठरणार गोड! या मोठ्या खेळाडूला मिळू शकते टीम इंडियात स्थान

हे खेळाडू इंग्लंड संघासोबत १७मे पासुन सराव करताना दिसु शकतात.

सध्या बेन स्टोक्स हा आयपीएलमधील सर्वात महागडा परदेशी खेळाडू आहेत परंतु त्याला या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही.

मार्क वूडला काही सामने चेन्नईकडून खेळायची संधी मिळाली आहे परंतु त्याला चमक न दाखवता आल्यामुळे तो राखीव खेळाडूंमध्येच जास्त दिसतो.

बेंगलोरकडून खेळणाऱ्या ख्रिस वोक्सलाहा संधी मिळाली परंतु त्याने मोठ्या प्रमाणावर धावा दिल्यामुळे तोही संघाबाहेर आहे.

मोईन अली एक सामना खेळला असून त्याने त्यात फलंदाजी किंवा गोलंदाजीत विशेष कामगिरी केलेली नाही.

Read- दोन मुंबईकर स्टार करणार भारतीय क्रिकेट संघाच नेतृत्व