सचिन-गांगुलीनंतर धोनीचेही पाय पकडणाऱ्या चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल

कोलकाता | गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोलकाताने ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा विजय कोलकाताला गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घेऊन गेला.

या सामन्यात २विकेट्स आणि ३२ धावा करणाऱ्या सुनिल नारायणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

या यामन्यात धोनीने धुव्वांदार खेळी केली. त्याने २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी फटकेबाजी केली. त्यात ४ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता.

११व्या षटकात जेव्हा रायडू आणि रैना फलंदाजी करत होते तेव्हा एक चाहता थेट सेक्युरीटीला बगल देत मैदानात आला. धोनी तेव्हा डगआऊटमध्ये बसला होता. त्याने डगआऊटमध्ये येत थेट धोनीचे पाय धरले.

यावेळी मुरली विजयसह डगआऊटमधील अन्य खेळाडू हा प्रकार पहात होते. ७ क्रमांकाची जर्सी घातलेल्या या चाहत्याने जेव्हा धोनीच्या पायांना स्पर्श केला तेव्हा धोनीनेही त्याच्या पाठीवर हात ठेवला.

एवढ सगळं होईपर्यंत मैदानावरील सुरक्षारक्षकांनी त्याला ओढत मैदानाबाहेर नेले.

यापुर्वी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये असे केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलतकर आणि सौरव गांगुलीबद्दल झालेले पहायला मिळाले आहे.

धोनीला हा अनुभव आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळीही आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
Video- ओवरमध्ये जिंकायला हव्या होत्या ५ धावा, घडले असे काही की…