IPL 2018: किंग्स ११ पंजाब केले या खेळाडूला कायम

आज आयपीएलच्या संघांनी ते त्यांचे कोणते खेळाडू संघात कायम ठेवत आहेत यांची नावे जाहीर केली आहेत. यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने त्यांच्या अक्षर पटेल या एकाच खेळाडूला कायम ठेवले आहे.

पंजाबने एकाच खेळाडूला कायम ठेवल्याने आता त्यांना २७ आणि २८ जानेवारीला होणाऱ्या मुख्य लिलावासाठी ३ राईट टू मॅच कार्ड वापरता येणार आहेत. यात त्यांना त्यांचे आणखी तीन खेळाडू कायम ठेवता येऊ शकतात. तसेच आता पंजाबकडे मुख्य लिलावासाठी ८० करोड पैकी ६७.५ करोड रुपये उरले आहेत.

अक्षर पटेलची कामगिरी आत्तापर्यंत टी २० क्रिकेटमध्ये चांगली राहिली आहे.मात्र सर्वांना पंजाबने हाशिम अमलाला कायम ठेवले नसल्याने आश्चर्य वाटले आहे.