कोलकाता नाईट रायडर्सचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय; असे आहेत ११ खेळाडूंचा संघ

कोलकाता। आयपीएल २०१८ मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये इडन गार्डन, कोलकाता येथे सामना होणार आहे. या सामन्यात कोलकाताचा नवीन कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सामना बंगलोर संघाचा कर्णधार विराटसाठी खास असणार आहे. कारण तो त्याचा आयपीएलमधील १५० वा सामना खेळणार आहे.

तसेच बंगलोरच्या फलंदाजी जबाबदारी आज विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, सर्फराज खान यांच्यावर असेल. तर कोलकाताचा कर्णधार कार्तिकच्या नेतृत्वखाली संघ कशी कामगिरी करतो याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

असे आहेत ११ जणांचे संघ:
कोलकाता नाईट रायडर्स: सुनील नारायण, ख्रिस लिन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, नितीश राणा, रिंकू सिंग, विनय कुमार, पियुष चावला, कुलदीप यादव, मिशेल जॉन्सन

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर: विराट कोहली,एबी डिव्हिलियर्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, सर्फराज खान, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, युजवेंद्र चहल, ख्रिस वोक्स, कुलवंत खजुरिलिया