आयपीएल 2018: पंजाबचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

कोलकता| आज आयपीएल 2018 चा 13 वा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होणार आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या दोन्ही संघांचा हा यावर्षीच्या मोसमातील पाचवा सामना आहे. तसेच या दोन्ही संघानी आत्तापर्यंत तीन सामन्यात विजय मिळवला आहे आणि एका सामन्यात पराभव स्विकारला आहे. 

कोलकाताचा नेट रन रेट जास्त असल्याने ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर पंजाबकडे आज विजय मिळवुन दुसऱ्या स्थानी यायला संधी आहे. पण त्याचबरोबर कोलकाताही गुणतालिकेतील अघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. 

कोलकताने त्यांचा मागिल सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. पंजाबने एक बदल करताना मोहित शर्मा ऐवजी अंकित राजपुतला संधी दिली आहे. 

असे आहेत 11 जणांचे संघ:

कोलकता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार),  रॉबीन उथप्पा, आंद्रे रसेल, ख्रिस लीन, पियुष चावला, कुलदिप यादव, शुभम गील, नितीश राणा,  शिवम मवी, सुनील नारायण, टॉम कुरेन

किंग्ज इलेवन पंजाब: आर अश्विन ( कर्णधार ), ख्रिस गेल , के एल राहूल , अॅरोन फिंच, मंयक अग्रवाल,युवराज सिंग, करूण नायर, बरिंदग स्रान, मुजिब अर रहमान, अॅड्रेयू टाय,  अंकीत राजपूत