IPL 2018: दिल्ली-चेन्नईमध्ये कोण ठरणार किंग?

पुणे। आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध दिल्ली डेअरडेविल्स असा सामना होणार आहे. हा 30वा सामना पुणे येथे असून त्याला रात्री ८.०० वाजता सुरुवात होणार आहे.

चेन्नई आत्तापर्यंत 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली मात्र 7 पैकी 2 विजयांसह गुणतालिकेत तळाला आहे.

जर आजचा सामना चेन्नईने जिंकला तर गुणतालिकेत त्यांना अव्वल स्थानावर विराजमान होण्याची संधी आहे. याच मैदानावर झालेल्या मागील सामन्यात मुंबईने चेन्नईला 8 विकेट्सने हरवले होते.

दिल्लीने मागील सामन्यात नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली कोलकाताला 55 धावांनी पराभूत केले. जो विजयी संघ मागच्या सामन्यात होता तोच आजच्याही सामन्यात कायम ठेवण्याची दाट शक्यता आहे.

या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने 40 चेडूंत नाबाद 93 धावा केल्या होत्या. फलंदाजीत अय्यर व्यतिरीक्त पृथ्वी शॉ, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि रिषभ पंत हे सुध्दा मुख्य भूमिका पार पाडू शकतात.

गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट ( 7 सामन्यात 11 विकेट्स ) तर त्याच्या साथीला ख्रिस मॉरीस, राहूल टेवातिया आणि अवेश खान आहेत.

चेन्नईला एक धक्का बसला तो त्यांचा वेगवान गोलंदाज दिपक चाहरला झालेल्या दुखापतीमुळे दोन आठवडे आयपीएलपासून दूर राहणार आहे. याच्या अनुपस्थितीत शार्दूल ठाकूर,  इम्रान ताहीर, कर्ण शर्मा आणि हरभजन सिंग हे गोलंदाजीची धूरा सांभाळतील.

फलंदाजीत एमएस धोनी, सुरेश रैना,  आंबती रायडू आणि अष्टपैलू ड्वेन ब्रावो,शेन वॉटसन असे अनेक पर्याय आहेत.

कधी होईल आयपीएल २०१८ मधील  चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा  30वा सामना आज, 30 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामना?
चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील आजचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होईल.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स सामना?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधीलचेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध  दिल्ली डेअरडेविल्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

चेन्नई सुपर किंग्ज: एम एस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, फाफ डू प्लेसिस, ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन, आंबती रायडू, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा,एन जगदीसन, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, शार्दूल ठाकूर, लुंगी एन्गिडी, मोनू सिंग कुमार, केएम असिफ, मार्क वूड, दीपक चाहर, कनिष्क सेठ, ध्रुव शोरे, क्षितिज शर्मा, चैतन्य बिष्णोई

दिल्ली डेअरडेविल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, अवेश खान, रिषभ पंत, गौतम गंभीर, ग्लेन मॅक्सवेल, अमित शर्मा, शहाबाज नदीम, विजय शंकर, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट, जेसन रॉय, डॅन ख्रिस्टन, कॉलिन मुन्रो, नमन ओझा, ख्रिस मॉरीस, राहूल टेवातिया, हर्षल पटेल, पृथ्वी शॉ, जयंत यादव, संदीप लामिचाने, मन्जोत कालरा, लियाम प्लकेंट