मास्टर ब्लास्टर सचिनला मुंबई देणार का ४५व्या वाढदिवसाची भेट ?

मुंबई। आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद असा सामना होणार आहे.

हैद्राबादने एकूण पाच सामने खेळले आहेत त्यापैकी सलग तीन सामने जिंकले आहेत. मात्र नंतरच्या दोन सामन्यात पंजाब आणि चेन्नई या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्यांची गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणात कामगिरी चांगली आहे. पहिल्या तीन सामन्यात त्यांनी विरोधी संघाला 150 धावसंख्येच्या आतच रोखले होते. मागील दोन सामन्यात त्यांची गोलंदाजी ढिसाळ झाल्याने विरोधी संघाने 192 आणि 182 एवढ्या धावसंख्येचे लक्ष्य देऊ शकला आहे. याच सामन्यांमध्ये राशिद खानला चांगलेच धुतले होते.

हैद्राबादकडे फलंदाजीत कर्णधार केन विल्यमसन सोडून बाकीच्यांची कामगिरी सुमार राहिली आहे. गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार (4 सामने 6 विकेट्स), सिध्दार्थ कौल (5 सामन्यात 6 विकेट्स) आणि बिली स्टानलेक (4 सामन्यात 5 विकेट्स) असे पर्याय उपलब्ध आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दुसरीकडे मुंबईने सुरूवातीलाच पराभवाची हॅटट्रिक केली आहे. त्यांनी 5 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. फलंदाजीत सुर्यकुमार यादवने खेळताना 140च्या स्ट्राईक रेटने 196 धावा केल्या आहेत. तसेच  एविन लेवीस आणि  ईशान किशन हे पण उत्तम पर्याय आहेत.

गोलंदाजीत मंयक मरकंडे याने या 5 सामन्यात 7.52 च्या इकोनॉमी रेटने 8 विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याला  कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह आणि  हार्दीक पांड्या यांनी त्याला योग्य साथ दिली आहे. तरीही  मुंबई एक विजयासह शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कधी होईल आयपीएल २०१८ मधील  मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद सामना?
मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा तेविसावा सामना आज, 24 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद यांच्यातील सामना?
मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद यांच्यातील आजचा सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होईल. तसेच या मैदानावरच मुंबईचे सर्व घरचे सामने होणार आहेत.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद सामना?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद  सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव, ईशान किशन , एविन लेवीस, मंयक मरकंडे, मिशेल मॅकलॅंघन, मुस्तफिजूर रहमान, हार्दीक पांड्या, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, राहुल चहर, बेन कटिंग, अखिला धंनजया, जे पी ड्युमिनी, सिध्देश लाड, शरद लुंबा, अडम मिलने, मोहसीन खान, एम डी निधीष, अनुकूल रॉय, प्रदिप संघवान,ताजिंदर सिंह, आदित्य तारे, सौरभ तिवारी

सनरायजर्स हैद्राबाद: केन विल्यमसन ( कर्णधार ), शिखर धवन, वृद्धीमान साहा, मनिष पांडे, शाकिब अल हसन, दिपक हुडा,भुवनेश्वर कुमार, युसुफ पठाण,राशिद खान, सिध्दार्थ कौल, ख्रिस जॉर्डन, तन्मय अग्रवाल, खलिल अहमद, बसिल थम्पी, रिकी भुई, बिपूल शर्मा, कार्लोस ब्रेथवेट, श्रीवत्स गोस्वामी, अलेक्स हेल्स, मेहेदी हसन, मोहम्मद नबी, टी नटराजन, सचिन बेबी, संदिप शर्मा, बिली स्टानलेक