IPL 2018: टीम धोनी की टीम रोहित, आजपासुन आयपीएलचा धमाका सुरू!

0 212

आजपासून पुढील ५१ दिवस आयपीएल २०१८ चा थरार रंगणार आहे. आज सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे.

या सामन्यातून २ वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमध्ये पुनरागमन करेल. मागील दोन वर्ष चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स संघावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आली होती.

त्यामुळे दोन वर्षानंतर पुनरागमन करून चेन्नई आपला पूर्वीचाच दबदबा कायम ठेवते का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.त्याचबरोबर गतविजेते मुंबई इंडियन्स आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्सला भारी पडले आहेत.

चेन्नईची फक्त मुंबई संघाविरुद्ध विजयाची सरासरी ५०% पेक्षा कमी आहे. त्यामुळे उद्या मुंबई घराच्या मैदानावर आपला जलवा दाखवते की चेन्नईचे पुनरागमन विजयाने होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना अशीच कामगिरी कायम ठेवण्याचे आव्हान असेल.

त्याचबरोबर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तसेच एक वर्षानंतर कर्णधारपदाची धुरा हाती घेतलेल्या एमएस धोनी यांच्या कामगिरीकडेही क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल

या सामन्याच्या आधी आयपीएलचा उदघाटन सोहळा पार पडेल .

कधी होईल आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा सलामीचा सामना आज, ७ एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आजचा सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होईल. तसेच या मैदानावर मुंबईचे सर्व घरचे सामने होणार आहेत.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या,जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, मुस्तफिजूर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, ईशान किशन, एव्हिन लेविस, सौरभ तिवारी, आदित्य तारे, शरद लुम्बा, सिद्धेश लाड, जेसन बेहरेनडॉर्फ, बेन कटिंग, अनुकूल रॉय, तेजिंदर सिंग, अकीला धनंजया, राहुल चाहर, मयांक मार्कंडे, मोहसीन खान, प्रदीप सांगवान, एमडी निधीश, जेपी ड्युमिनी

चेन्नई सुपर किंग्स : एम एस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, फाफ डू प्लेसिस, ड्वेन ब्रावो, केदार जाधव,शेन वॉटसन, आंबती रायडू, इम्रान ताहीर,कर्ण शर्मा,एन जगदीसन, मुरली विजय,सॅम बिलिंग्स, शार्दूल ठाकूर, लुंगी एन्गिडी,मोनू सिंग कुमार, केएम असिफ, मार्क वूड, दीपक चाहर, कनिष्क सेठ, ध्रुव शोरे, क्षितिज शर्मा,चैतन्य बिष्णोई

Comments
Loading...
%d bloggers like this: