IPL 2018: उद्या होणार आयपीएल २०१८च्या ह्या मोठ्या गोष्टीचे थेट प्रक्षेपण

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.या मोसमाच्या लिलावाआधी आयपीएल संघांना ते त्यांचे कोणते खेळाडू संघात कायम ठेवणार आहे हे जाहीर करावे लागणार आहे. संघात कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची ४ जानेवारी ही शेवटची तारीख आहे.

कोणते खेळाडू कोणत्या संघात कायम ठेवले जाणार हे जाहीर करण्याचा कार्यक्रम यावर्षी आयपीएलचे प्रक्षेपण हक्क विकत घेतलेल्या स्टार इंडियाच्या चॅनेलवरून प्रसारित करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडेल.याआधी आयपीएल संघ कोणते खेळाडू संघात कायम ठेवणार आहेत हे बीसीसीआयला औपचारिक इमेल करून कळवत होते. पण आता हा कार्यक्रम सामान्य लोकांनाही पाहता येणार आहे.

आयपीएलच्या रिटेनेशन पॉलिसीनुसार कोणताही संघ ५ खेळाडूंना कायम ठेवू शकतो. त्यासाठी लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकतात.यावर्षीच्या आयपीएलचा लिलाव बंगळुरूमध्ये २७ आणि २८ जानेवारी असे दोन दिवस होणार आहे.

याआधी आयपीएलच्या १० व्या मोसमाच्या प्रक्षेपण हक्क सोनी पिच्चर नेटवर्क यांच्याकडे होते. आता २०१८ ते २०२२ पर्यंतचे हे प्रक्षेपण हक्क स्टार इंडियाने विकत घेतले आहेत.

कधी होणार आहे खेळाडू कायम ठेवण्याचा कार्यक्रम: ४ जानेवारी २०१८

कुठे होणार आहे हा कार्यक्रम: ताज लँड्स एन्ड, मुंबई

कार्यक्रमाची वेळ: संध्या. ६.५० वाजल्यापासून

कोणत्या चॅनेलवर होणार कार्यक्रम प्रसारित: स्टार स्पोर्ट्स २/एचडी आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी १/एचडी