IPL 2018: आज कोलकाता गेल नावाचे वादळ रोखणार का ?

कोलकाता| आज आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब एकमेकांना भिडणार आहे. या 11व्या मोसमात कोलकाताने आत्तापर्यंत चार सामने खेळले असून त्यातील तीन सामने जिंकले आहेत. यातील एक सामन्यात त्यांना हैद्राबाद विरूध्द पराभूत व्हावे लागले.

पंजाबनेही चार सामने खेळले असून त्यातील तीनमध्ये विजय मिळवला आहे आणि एका सामन्यात पराभव स्विकारला होता. मागील सामन्यात त्यांनी हैद्राबादला पराभूत केले होते.

कोलकाताचा नेट रन रेट जास्त असल्याने ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. आज पंजाबकडे दुसऱ्या स्थानी यायला संधी आहे. या दोन्ही संघांची कामगिरी उत्कृष्ठ आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार नवीन आहेत मात्र त्यांची निर्णयक्षमता चांगली आहे.

सौजन्य: अल्फा प्रेडिक्शन

पंजाबकडून गेलने या मोसमातील पहिले शतक केले आहे. त्याने लागोपाठच्या दोन सामन्यांत चांगल्या धावा करून संघाला विजय मिळवून दिला आहे.

कोलकाताकडून रॉबीन उथप्पाने सुरूवात चांगली केली आहे. त्याचा या मोसमातील स्ट्राईक रेट 140.65 अाहे. दुसरीकडे नितीश राणा यानेसुध्दा अष्टपैलू खेळी केली आहे. मागच्या दोन सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कारही मिळवला आहे.

आजच्या सामन्यात कोलकाता पुढे पंजाबचे गेल नावाचे वादळ रोखण्याचे आव्हान आहे. मागच्या सामन्यात केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती गेल करेल का? तसेच गेलचे आव्हान कोलकाता कसे झेलेल हे बघण्यासारखे असेल.

 

सौजन्य: अल्फा प्रेडिक्शन

 

कधी होईल आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब सामना?

कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा अठरावा सामना आज, 21 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यातील सामना?
कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यातील आजचा सामना इडन गार्डन स्टेडियम, कोलकाता येथे होईल.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब सामना?
आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब सामना आज संध्याकाळी 4.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी ३.३० वाजता होईल.

सौजन्य: अल्फा प्रेडिक्शन

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाब सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

सौजन्य: अल्फा प्रेडिक्शन

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार),रॉबीन उथप्पा, आंद्रे रसेल, ख्रिस लीन, पियुष चावला, कुलदिप यादव, मिशेल जॉन्सन, सुनिल नारायन, शुभम गील, इशांक जग्गी, कमलेश नागरकोती, नितीश राणा, विनय कुमार, अपुर्व वानखाडे, रिंकू सिंग, शिवम मवी, जॅवोन सर्लस, कॅमरॉन डेलपोर्ट

किंग्ज इलेवन पंजाब: आर अश्विन ( कर्णधार ), ख्रिस गेल , के एल राहूल , अॅरोन फिंच, मंयक अग्रवाल,युवराज सिंग, करूण नायर, मोहित शर्मा, बरिंदग स्रान, मुजिब अर रहमान, अॅड्रे टाय, अक्षदिप नाथ, मंयक दागर, बेन द्वारशूईस, मंजूर दार, डेविड मिलर, अक्षर पटेल, अंकीत राजपूत, प्रदिप साहू, मार्कस स्टोनिस, मनोज तिवारी

 

महत्त्वाच्या बातम्या –