‘ज्युनिअर द्रविड’ अजिंक्य रहाणेचा चाहता!

जयपूर| या वर्षीच्या आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करत आहे. 2008चे विजेतेपद मिळवणाऱ्या या संघाला पहिल्याच सामन्यात हैद्राबाद विरूध्द 9 विकेट्सने पराभूत व्हावे लागले.

मात्र नंतरच्या दोन सामन्यामध्ये राजस्थान विजयाच्या मार्गावर परत आला. यात त्यांनी दिल्लीच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 10 धावांनी विजय मिळवला होता. तिसऱ्या सामन्यात बेंगलोरचा 19 धावांनी पराभव केला होता.

अजिंक्य रहाणेला यावर्षी राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे कारण की चेंडू छेडछाणी प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटने स्टिव स्मिथवर बंदी घातली आहे. या मोसमात रहाणेची कामगिरी पण चांगली आहे.

बेंगलोरच्या सामन्यानंतर रहाणेने राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड बरोबर काही फोटो काढले. यामध्ये दोघांनीही 27 या सारख्या क्रमांकाची जर्सी घातली होती.

हे फोटोज राजस्थान रॉयल्सच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आले आहेत.

आज राजस्थानचा कोलकाता विरूध्द सामना आहे. यामध्ये जर राजस्थानने कोलकाताचा पराभव केला तर ते विजयाची हॅटट्रिक करू शकतात. हा सामना सवाई मानसिंग स्टेडिअम, जयपूर येथे होणार आहे.