IPL 2018: मुंबई इंडियन्सने संघात कायम केले हे ३ खेळाडू

0 404

आयपीएलचे तीन वेळचे विजेते मुंबई इंडियन्स यावर्षी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या खेळाडूंना संघात कायम केले आहे. हे तिन्ही खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नियमित सदस्य आहेत.

सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत मुंबई इंडियन्सने भविष्याचा विचार करत हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह ह्या खेळाडूंवर विश्वास दाखवला.

परंतु मुंबईला अनेक मोसमात चांगली साथ देणाऱ्या लसिथ मलिंगा, हरभजन सिंग आणि मिचेल जॉन्सन या खेळाडूंना मात्र संघाने संघात कायम केले नाही. मुंबई कडून १०व्या मोसमात चांगली कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याचा भाऊ कृणालही मुंबईने संघात ठेवले नाही.

Comments
Loading...
%d bloggers like this: