IPL 2018: कोलकाता नाईट रायडर्सने गंभीर ऐवजी या २ खेळाडूंवर दाखवला विश्वास

मुंबई । कोलकाता नाईट रायडर्सने काही धक्कादायक परंतु भविष्याचा विचार करून खेळाडूंना संघात कायम केलेले स्पष्ट दिसत आहे. त्यांनी सुनील नारायण आणि आंद्रे रुसेल या विंडीजच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.

आयपीएलच्या दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघात मोठे खेळाडू आहेत. त्यामुळे हा संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार हा प्रश्न होता. खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी त्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागणार होते.

यावर्षीच्या आयपीएल रिटेनेशन पॉलिसीनुसार कोणत्याही संघांना ५ खेळाडू कायम ठेवता येणार होते. त्यासाठी लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकते.

यानुसार कोलकाताला त्यांच्याकडे असणाऱ्या गौतम गंभीर, आंद्रे रसल, मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, सुनील नरिन, कुलदीप यादव, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, नॅथन कुल्टर नाईल, उमेश यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन आणि ख्रिस वोक्स यांसारख्या मोठ्या खेळाडूंमधून सध्यातरी सुनील नारायण आणि आंद्रे रुसेल या खेळाडूंना संघात कायम केले आहे.

रॉबिन उथप्पा सारख्या मोठ्या खेळाडूला संधी न देऊन मात्र केकेआरने सर्वांचं आश्चर्याचा धक्का दिला आहे.