या खेळाडूचा खेळ पाहून रोहीत म्हणतो, आता २०० धावांचं पण कौतूक नाही

0 190

मोहाली| काल आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 4 विकेट्सने विजय मिऴवला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने अर्धशतक केले होते. मात्र तरीही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.

असे असले तरी धोनीला काल पाठीच्या दुखापतीमुऴे त्रास होत होता आणि तरीही त्याने शेवटपर्यंत लढत दिली होती. त्यामुऴे त्याने काल कालेल्या अर्धशतकाचे सर्वानी कौतुक केले . या कौतुक करणाऱ्यांमध्ये मुंबईचा कर्णधार रोहीत शर्माही आहे. रोहीतने ट्विटरच्या माध्यमातून धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ” धोनीने खूप चांगला खेऴ केला. तुम्ही जवऴ जवऴ विजयाच्या समीप होता. आता 200 धावाही सुरक्षित नाही? असे काल मला वाटले.”

काल पंजाबने चेन्नईला विजयासाठी 198 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने 40 चेंडूत नाबाद 79 धावांची खेऴी केली होती. यात त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत.

धोनीची ही आयपीएलमधील सर्वोच्च खेऴी आहे. याआधी धोनीच्या खराब फॉर्ममुऴे त्याच्यावर टिका होत होती पण कालच्या त्याच्या खेऴीने मात्र सर्वांना उत्तर दिले आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: