त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!

मुंबई | काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स सामना चेन्नईने ८ विकेट्सने जिंकला. हे चेन्नईचे या स्पर्धेतील तिसरे विजेतेपद ठरले.

या स्पर्धेत अॅँड्रु टाय या खेळाडूला काल पर्पल कॅप तसेच १० लाखांचा चेक देऊन सन्मानिक करण्यात आले. तो काल प्रत्यक्ष बक्षिस स्विकारण्यासाठी उपस्थित नव्हता.

त्याने या स्पर्धेत एकुण पंजाबकडून खेळताना १४ सामन्यात २१.८०च्या सरासरीने २४ विकेट्स घेतल्या. परंतु त्याचा संघ मात्र या स्पर्धेत ७व्या स्थानी राहिला.

त्याला पंजाब संघाने ७.२ कोटी रुपये देऊन संघात घेतले होते. या ३१ वर्षीय खेळाडूने चांगली कामगिरी करताना पंजाब संघ व्यवस्थापणाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. त्याची एक विकेट या आयपीएलमध्ये ३० लाख रुपयांना गेली. तो आयपीएलमध्ये पर्पल कॅप मिळवणारा पहिलाच खेळाडू ठरला.

महत्त्वाच्या बातम्या-

-विजेतेपदामुळे धोनीचा चाहत्यांकडून दुर्लक्षित झालेला क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम!

संपुर्ण यादी- आयपीएल २०१८मध्ये या खेळाडूंना मिळाले अॅवार्ड्स

आयपीएलच्या इतिहासातील ही आहे सर्वात वेगळी आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्जचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल!

चेन्नई सुपर किंगमधील खरा ‘किंग’ धोनीच आहे, जाणुन घ्या काय आहे कारण

-धोनी ते वाक्य बोलला आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी !

धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!

सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू

म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन