असे असणार आयपीएल २०१८चे वेळापत्रक

मुंबई |आयपीएल २०१८च्या मोसमाची घोषणा काल करण्यात आली. ७ एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई  इंडियन्स संघाचा सामना माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाबरोबर होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर होणार आहे. 

तब्बल ५१ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा शेवटही मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर होणार आहे.  अंतिम सामना हा २७ मे २०१८ रोजी होणार आहे. 

या स्पर्धत प्रत्येक संघ ७ संघांबरोबर घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळणार आहेत.   त्यातील टाॅप ४ संघ प्ले आॅफसाठी पात्र ठरणार आहे. 

टाॅप २ संघ हे थेट qualifierला पात्र ठरणार आहेत. त्याचा सामना मुंबईमध्ये होणार असून विजयी संघ थेट अंतिम फेरीसाठी ठरणार आहे. तर qualifier १ चा पराभूत संघ eliminator १ मधील विजेत्या संघाशी दोन हात करेल. 

या स्पर्धतील सामने हे संध्याकाळी ५ वाजुन ३० मिनिटांनी तर दुसरा सामना संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.