IPL 2018: सनरायझर्स हैद्राबाद भुवी-वॉर्नरला करणार कायम की शिखर-रशीदवर ठेवणार विश्वास

0 143

आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी आयपीएल संघांना ते कोणते खेळाडू संघात कायम ठेवणार आहेत हे आज जाहीर करावे लागणार आहे. यात आयपीएलमधील सनरायझर्स हैद्राबाद संघ कदाचित कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमारला संघात कायम ठेवू शकतात.

त्यांच्याकडे संघात कायम ठेवण्यासाठी शिखर धवन आणि रशीद खान असे पर्याय देखील उपलब्ध आहेत. आयपीएल रिटेन्शन पॉलिसीनुसार कोणताही संघ ५ खेळाडूंना संघात कायम ठेऊ शकतात, त्यासाठी लिलावापूर्वी आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकतात.

त्यामुळे उद्या संघात कायम ठेवणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याच्या कार्यक्रमात हैद्राबाद वॉर्नर आणि भुवनेश्वर यांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच लिलावादरम्यान राईट टू मॅच कार्ड वापरून धवन किंवा रशीद यांच्यापैकी संघात कायम ठेवण्यासाठी निवड करू शकतात. हैद्राबादकडे राईट टू मॅच कार्ड वापरून मोझेस हेन्रिके किंवा मुस्ताफिझूर रहमान यांच्यापैकी खेळाडूला संघात ठेवण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.

त्यामुळे आज हैद्राबाद कोणत्या खेळाडूंचे नाव संघात कायम ठेवण्यासाठी जाहीर करतात हे बघावे लागेल. आजच्या या कार्यक्रमानंतर २७ आणि २८ जानेवारीला आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव होणार आहे. तसेच आजचा खेळाडू रिटेन्शनचा कार्यक्रम स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे सर्वांना कोणते संघ त्यांचे कोणते खेळाडू संघात कायम ठेवतात हे पाहता येणार आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: