चेन्नई खेळाडूंच्या गोड मुलींच्या फोटोने जिंकली चाहत्यांची मने!

बॉलिवूड स्टारकिड्सची नेहमीच चर्चा होत असते. पण आयपीएलचा हंगाम सुरु झाल्यापासून क्रिकेटपटुंच्या मुलांचीही मोठी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यात सर्वात जास्त चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंच्या मुलांची चर्चा होताना दिसून येत आहे.

आयपीएलमधील चेन्नई संघाच्या ट्विटर अकाउंटवरूनही या खेळाडूंच्या मुलांचे फोटो शेयर करण्यात आले आहेत. हे फोटो चांगलेच वायरल झाले आहेत. यात कॅप्टन कूल एमएस धोनीची मुलगी झिवा, सुरेश रैनाची मुलगी ग्रेशिया आणि हरभजन सिंगची मुलगी हिनायाहीर यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.

हरभजनची पत्नी गीता बसराने ग्रेशिया आणि हीनायाचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता. हा फोटो चाहत्यांमध्ये चांगलाच वायरल झाला आहे. तसेच हाच फोटो सुरेश रैना, हरभजन सिंग यांनीही पोस्ट केला आहे.

याबरोबरच झिवाचे धोनीबरोबरचे व्हिडीओ आणि फोटो वायरल होत आहेत. झिवाचा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवारही चांगला चाहता वर्ग आहे.