IPL 2018: कोणाला कायम करणार दिल्ली डेअरडेव्हिल्स ?

आज आयपीएल संघांना ते कोणते खेळाडू संघात कायम ठेवणार आहेत त्यांची नावे जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे. ही नावे जाहीर करण्याचा आज मुंबईमध्ये कार्यक्रम होणार आहे.

आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात मागील काही वर्षांपासून नेतृत्वाचा प्रश्न उभा राहत आहे. त्यांचे कर्णधार बदलत राहिल्यामुळे त्यांना मागील काही मोसमात अपयश आले आहे. त्यामुळे ते यावेळी अशा नेतृत्वगुण असणाऱ्या खेळाडूच्या शोधात असतील.

तरीही दिल्ली त्यांच्याकडे असणारे तरुण खेळाडू क्विंटॉन डिकॉक, श्रेयश अय्यर, रिषभ पंत, ख्रिस मॉरिस आणि पॅट कमिन्स यांच्यापैकी खेळाडू संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे.

याबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा यावर्षी यशस्वी ठरलेला गोलंदाज कागिसो रबाडा आणि भारताचा जलदगती गोलंदाज मोहोम्मद शमी हे देखील दिल्लीकडे संघात कायम ठेवण्यासाठी पर्याय ठरू शकतात.

पण कदाचित दिल्ली आज एकही खेळाडूला कायम न ठेवता २७ आणि २८ जानेवारीला होणाऱ्या यावर्षीच्या आयपीएलच्या लिलावात ३ राईट टू मॅच कार्ड वापरून खेळाडू संघात कायम ठेऊ शकतात.

आयपीएल रिटेन्शन पॉलिसीनुसार कोणताही संघ ५ खेळाडूंना कायम ठेवू शकतो. त्यासाठी लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकतात.