१६ वर्षाच्या मुलीने आयपीएल लिलावात उधळले कोट्यवधी रुपये

0 328

आयपीएल २०१८ साठीचा लिलाव काल आणि परवा बंगळुरूमध्ये पार पडला. या लिलावादरम्यान फ्रॅन्चायझींनी अनेक खेळाडूंवर कोटींची बोली लावली. पण या लिलावादरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री जुही चावला आणि व्यावसायिक जय मेहता यांची १६ वर्षीय मुलगी जान्हवी मेहताने.

जान्हवी ही आयपीएल लिलावात आत्तापर्यंत सहभागी होणारी सर्वात लहान वयाची सदस्य ठरली आहे. तिने लिलावाच्या दोन्ही दिवशी हजेरी लावली होती. तसेच तिने या लिलावात खेळाडूंसाठी बोलीही लावली.

जुही चावला आणि जय मेहता हे कोलकाता नाईट रायडर्सचे सहसंघमालक आहे. त्यामुळे जान्हवी आयपीएल लिलावासाठी आली होती. या लिलावादरम्यान तिची बुद्धिमत्ताही दिसून आली. त्याचे किंग्स इलेव्हन पंजाबची संघमालक प्रीती झिंटानेही ट्विटरवरून कौतुक केले आहे.

जान्हवीने तिचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून पूर्ण केले आहे. तसेच तीला दहावीमध्येही चांगले गुण मिळाले होते. ती पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये आली होती. यानंतरचे शिक्षण ती लंडनमधील चार्टर हाऊसमध्ये घेत आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: