गेल्यावर्षी आयपीएलमध्ये १२ कोटी मिळालेल्या स्टार खेळाडूला केवळ दीड कोटीच मिळणार?

पुढील आठवड्यात 18 डिसेंबरला जयपूर येथे आयपीएल 2019 साठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात 70 जागांसाठी 1003 खेळाडूंमधून 346 खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुळ किमतीही जाहीर करण्यात आल्या आहेत.

निवड झालेल्या 346 खेळाडूंमध्ये 118 कॅप खेळाडूंचा (किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू) समावेश आहे. या खेळाडूंची मुळ किंमत 2 कोटी ते 50 लाखांपर्यंत आहे. तसेच 228 अनकॅप खेळाडूंची (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेला खेळाडू) निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंची मुळ किंमत 40 लाख ते 20 लाखापर्यंत आहे.

या लिलावासाठी सर्वाधिक 2 कोटी रुपयांची मुळ किंमत 9 खेळाडूंना ठेवण्यात आली आहे. यामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. हे सर्व 9 खेळाडू परदेशी आहेत. यात ब्रेंडन मॅक्यूलम, ख्रिस वोक्स, लसिथ मलिंगा, कॉलिन इंग्राम, शॉन मार्श, कोरे अँडरसन, सॅम करन, अँजेलो मॅथ्यूज आणि डॉर्सी शॉर्ट या नऊ खळाडूंचा समावेश आहे.

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मुळ किंमत 1.5 कोटी रुपये असून यासाठी 10 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये फक्त जयदेव उनाडकट या भारतीय खेळाडूचा समावेश आहे. अन्य 9 खेळाडू परदेशी आहेत.

1.5 कोटी मुळ किंमत असणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्टो, मार्ने मॉर्केल, डेल स्टेन, रिली रोसोउ, लूक राइट, अॅलेक्स कॅरे, लियाम डावसन यांचा समावेश आहे.

भारतीय खेळाडूंमध्ये जयदेव उनाडकटला मिळालेली मुळ किंमत ही सर्वाधिक आहे. त्याच्या पाठोपाठ युवराज सिंग, वृद्धिमान सहा, मोहम्मद शमी आणि अक्षर पटेल या चार भारतीय खेळाडूंना 1 कोटी ही मुळ किंमत ठेवण्यात आली आहे. 1 कोटी मुळ किंमत असणारे एकूण 19 खेळाडू आहेत. त्यात 15 परदेशी खेळाडू आहेत.

मागील मोसमात बोली न लागलेल्या इशांत शर्मासाठी 75 लाख अशी मुळ किंमत ठेवण्यात आली आहे. त्याच्याबरोबर नमन ओझा या यष्टीरक्षकासाठीही 75 लाख अशी मुळ किंमत असणार आहे. या दोन भारतीय खेळाडूंना 75 लाख ही मुळ किंमत मिळाली आहे.

त्याचबरोबर 50 लाख मुळ किंमत मिळालेल्या खेळाडूंमध्ये 18 भारतीय तर 44 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

अनकॅप खेळाडूंमध्ये 40 लाख किंमत 7 परदेशी खेळाडूंना ठेवण्यात आली असून यातही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. त्याच्या पाठोपाठ 30 लाख अशी मुळ किंमत असून यात 5 भारतीय आणि 3 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तर सर्वात कमी मुळ किंमत 20 लाख अशी आहे. यासाठी 196 भारतीय खेळाडूंची आणि 17 परदेशी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

यावर्षी आयपीएल लिलावात एक मोठा बदल दिसणार आहे तो म्हणजे, गेले 11 वर्षे आयपीएल लिलावात लिलावकर्ते म्हणून काम पाहणारे रिचर्ड मॅडली यावर्षी आयपीएल लिलावात नसणार आहेत. त्यांच्या ऐवजी लिलावकर्ता म्हणून ह्यूज एजमेड्स यांची निवड करण्यात आली आहे.

या देशाच्या खेळाडूंची झाली आहे आयपीएल लिलावासाठी निवड-
226 खेळाडू – भारत
26 खेळाडू – दक्षिण आफ्रिका
23 खेळाडू – आॅस्ट्रेलिया
18 खेळाडू – विंडीज
18 खेळाडू – इंग्लंड
13 खेळाडू –  न्यूझीलंड
8 खेळाडू  – अफगाणिस्तान
7 खेळाडू – श्रीलंका
2 खेळाडू  – बांगलादेश
2 खेळाडू – झिम्बाब्वे
1 खेळाडू – अमेरिका
1 खेळाडू – आयर्लंड
1 खेळाडू – नेदरलँड

 

महत्त्वाच्या बातम्या:

द वाॅल द्रविडपेक्षाही कोहलीची वाॅल होणार विराट, जाणून घ्या काय आहे कारण

आजपर्यंतची विराट कोहलीची एवढी मोठी चूक कुणीच दाखवून दिली नव्हती

पर्थ कसोटीसाठी त्या मुंबईकर खेळाडूला वगळणार? असा असेल ११ खेळाडूंचा संघ

ज्या विक्रमाला सचिनला २० वर्ष लागले तो विराट ६ वर्षांतच मोडणार