उद्या होणाऱ्या आयपीएल 2019 लिलावाबद्दल सर्वकाही…

उद्या(18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएल 2019 चा लिलाव रंगणार आहे. त्यामुळे सर्वच संघांनी या लिलावासाठी तयारी सुरु केली आहे. या लिलावासाठी आठही संघांनी त्यांचे काही खेळाडू मुक्त केले आहेत. त्यामुळे अनेक संघांमध्ये नवीन चेहेरे दिसण्याची शक्यता आहे.

तसेच यावर्षीपासून दिल्लीचा संघ दिल्ली कॅपिटल्स या नवीन नावासह स्पर्धेत उतरणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाबने 11 खेळाडूंची विश लिस्ट (संघात घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची यादी) तयार केली आहे.

यावर्षी आयपीएल लिलावासाठी 1003 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील 346 खेळाडूंचीच अंतिम निवड करण्यात आली आहे. यात 226 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

तसेच निवड झालेल्या 346 खेळाडूंमध्ये 118 कॅप खेळाडूंचा (किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू) समावेश आहे. या खेळाडूंची मुळ किंमत 2 कोटी ते 50 लाखांपर्यंत आहे. तर 228 अनकॅप खेळाडूंची (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेला खेळाडू) निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंची मुळ किंमत 40 लाख ते 20 लाखापर्यंत आहे.

त्यामुळे कोणता संघ कोणत्या खेळाडूला संघात घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

त्याचबरोबर यावर्षी आयपीएल लिलावात एक मोठा बदल दिसणार आहे तो म्हणजे, गेले 11 वर्षे आयपीएल लिलावात लिलावकर्ते म्हणून काम पाहणारे रिचर्ड मॅडली यावर्षी आयपीएल लिलावात नसणार आहेत. त्यांच्या ऐवजी लिलावकर्ता म्हणून ह्यूज एजमेड्स यांची निवड करण्यात आली आहे.

आयपीएल 2019 लिलावाबद्दल सर्वकाही…

कधी होणार आहे 2019 आयपीएल लिलाव?

2019 आयपीएल लिलाव 18 डिसेंबर 2018 ला होणार आहे.

कुठे होणार आहे 2019 आयपीएल लिलाव?

2019 आयपीएल लिलाव जयपूर, राजस्थान येथे होणार आहे.

किती वाजता होणार आहे 2019 आयपीएल लिलाव?

2019 आयपीएल लिलाव 18 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता सुरु होणार आहे.

कोणत्या चॅनेलवर पाहता येईल 2019 आयपीएल लिलाव?

2019 आयपीएल लिलाव स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येणार आहे.

2019 आयपीएल लिलाव आॅनलाइन कसा पाहता येईल?

2019 आयपीएल लिलाव हॉटस्टारवर(Hotstar) लाइव्ह पाहता येईल.

या देशाच्या खेळाडूंची झाली आहे आयपीएल लिलावासाठी निवड-
226 खेळाडू – भारत
26 खेळाडू – दक्षिण आफ्रिका
23 खेळाडू – आॅस्ट्रेलिया
18 खेळाडू – विंडीज
18 खेळाडू – इंग्लंड
13 खेळाडू –  न्यूझीलंड
8 खेळाडू  – अफगाणिस्तान
7 खेळाडू – श्रीलंका
2 खेळाडू  – बांगलादेश
2 खेळाडू – झिम्बाब्वे
1 खेळाडू – अमेरिका
1 खेळाडू – आयर्लंड
1 खेळाडू – नेदरलँड्स

 

महत्त्वाच्या बातम्या:

पृथ्वी शॉच्या ऐवजी टीम इंडियात निवड झालेला कोण आहे मयंक अगरवाल?

बॉक्सिंग डे कसोटीसाठी या दोन प्रतिभावान खेळाडूंचा टीम इंडियात समावेश?

मोठी बातमी: भारताला मोठा धक्का, पृथ्वी शॉ कसोटी मालिकेला मुकणार

Video: आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मुरली विजयला कोहलीबद्दल असे काही बोलला की ऐकून थक्क व्हाल!