कॅप्टन कूल धोनी विरुद्ध किंग कोहली सज्ज

आयपीएल 2019 ला पुढिल आठवड्यात 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आता सर्वांनाच आयपीएलच्या या 12 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या मोसमातील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.

त्यामुळे चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी उत्सुकता बघायला मिळत आहे. ही उत्सुकता दाखवणाऱ्या आयपीएयच्या प्रमोशनल जाहीरातीचा एक व्हिडिओ आयपीएलच्या ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी आणि बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीचे संभाषण तसेच चाहत्यांची या सामन्यासाठी असलेली उत्सुकता दाखवण्यात आली आहे.

या व्हिडिओला कॅप्शन देताना आयपीएलच्या ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे की, ‘धोनी, धोनी किंवा कोहली, कोहली? आम्ही या सामन्याची वाट बघू शकत नाही. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर.’

तसेच या व्हिडिओमध्ये चाहते या सामन्याची तयारी करताना दिसत आहेत आणि धोनी…धोनी..कोहली…कोहली असे ओरडत आहेत. हे सर्व पाहताना धोनी आणि कोहली एका बाल्कनीमध्ये चहा पित असताना संभाषण करताना दिसले आहेत.

तसेच यावर चर्चा करताना कोहली धोनीला म्हणातो, ‘मग काय वाटते?’ त्यावर धोनी म्हणाला, ‘धोनी कोहली तर फक्त नावे आहेत.’ लगेचच विराट धोनीला चिअर्स करताना म्हणाला, ‘बरोबर, चल मग खेळ दाखवू.’ यावर धोनी म्हणातो, ’23 मार्च, उशीर करु नकोस.’ धोनीला उत्तर देताना विराटही म्हणाला, ‘नक्किच.’

मागील वर्षी चेन्नईने दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करत विजेतेपद जिंकले होते. हे त्यांचे आयपीएलचे तिसरे विजेतेपद ठरले. यावर्षी चेन्नई हे विजेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करतील. तर बेंगलोरला अजून एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे ते पहिले विजेतेपद मिळवण्यास उत्सुक असतील.

यावर्षीच्या आयपीएलमधे चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडणारा पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडीयम या चेन्नईच्या घरच्या मैदानावर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जाणून घ्या १४२ वर्षांचा कसोटी क्रिकेटचा इतिहास

ऑस्ट्रेलियासह या तीन देशांनी केला आहे हा मोठा कारनामा