अरे मुर्खा तुला कुणी आयपीएलमध्ये विकत तरी घेतलंय का?

मंगळवारी(18 डिसेंबर) जयपूर येथे आयपीएल 2019 साठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात जवळ जवळ सर्वच संघानी युवा खेळाडूंना पसंती दिल्याने ब्रेंडन मॅक्यूलम, डेल स्टेन, अॅलेक्स हेल्स, चेतेश्वर पुजारा यांसारख्या दिग्गज खेळाडूंवर कोणी बोली लावली नाही.

त्यामुळे याबद्दल क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे. यातच एका चाहत्याने आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनलाही कोणी खरेदीदार मिळाला नाही अशा गैरसमजातून एक ट्विट केला आहे.

खरंतर जॉन्सन हा याच वर्षाच्या सुरुवातीला क्रिकेटच्या सर्वप्रकारातून निवृत्त झाला आहे. त्यामुळे आयपीएल लिलावात खेळाडूंच्या यादीत जॉन्सनचे नावच नव्हते. पण हे माहित नसलेल्या त्या चाहत्याने ट्विट केले आहे की ‘अरे मुर्ख तूला कोणी विकत घेतले नाही.’

यावर जॉन्सननेही त्या चाहत्याला त्याने निवृत्ती घेतली असल्याची आठवण करुन देताना ट्विट केले आहे की, ‘हॅलो, चॅम्पियन, तूझ्या लक्षात यावे म्हणून सांगतो मी या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.’

सध्या सुरु असलेल्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान जॉन्सनने कोहलीवर टीका करताना त्याला मुर्ख म्हटले म्हणून त्या चाहत्याने जॉन्सनला मुर्ख म्हटले असल्याचे स्पष्टीकरण पुन्हा ट्विट करुन दिले आहे.

जॉन्सन हा 2017च्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स संघात होता. त्यानंतर तो 2018 ला कोलकता नाइट रायडर्स संघाकडून खेळला. त्याने नोव्हेंबर 2015 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

गौतम गंभीरच टेन्शन वाढलं, दिल्ली न्यायालयाने बजावले समन्स

आयपीएलमध्ये निवड झालेल्या त्या दोन चुलत भावांच्या घरी रात्री उशीरापर्यंत सेलिब्रेशन

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या या मोठ्या खेळाडूला संघातून डच्चू