आयपीएल- एकवेळ दिल्ली गाजवलेला खेळाडू आता मुंबईच्या ताफ्यात

मंगळवारी (18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएल 2019 चा लिलाव पार पडला. त्यामुळे आता आयपीएलमध्ये ट्रेडींग विंडो सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 2019 आयपीएलचा मोसम सुरु होण्याच्या 30 दिवस आधीपर्यंत सुरु राहणार आहे.

या प्रक्रियेच्या मदतीने भारताचा 28 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू जयंत यादवला दिल्ली कॅपिटल्स संघाकडून मुंबई इंडियन्सने संघात सामील करुन घेतले आहे.

जयंत दिल्लीकडून 2015 पासून खेळत असून त्याने आत्तापर्यंत फक्त 10 आयपीएलचे सामने खेळले आहेत. तसेच तो भारताकडून चार कसोटी सामने आणि एक वनडे सामना खेळला आहे.

जयंत हा देशांतर्गत स्पर्धेत हरियाणा संघाकडून खेळतो. सध्या तो श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारताने नेतृत्व करत आहे.

जयंतच्या आधी ट्रेडिंग विंडोच्या मदतीने मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून क्विंटॉन डिकॉकला संघात घेतले आहे.

मुंबई संघातील जयंतच्या समावेशाबद्दल मुंबई इंडियन्सचा संघमालक आकाश अंबानी म्हणाला, ‘जयंत मुंबईत आल्याने आम्ही आनंदी आहोत. त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या अनुभवाचा मुंबई इंडियन्सला फायदा होईल. लिलावानंतर काही दिवसातच तो आमच्यात सामील झाल्याने आनंद वाटत आहे.’

महत्त्वाच्या बातम्या:

युवराज सिंग या कारणामुळे आयपीएल २०१८मध्ये झाला होता अपयशी…

धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे!

भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक