ती शर्यत नक्की जिंकणार कोण? रोहित, रैना की धोनी…

आयपीएलच्या 12 व्या मोसमाला आता फक्त एक आठवड्याचा कालावधी राहिला आहे. येत्या 23 मार्चपासून आयपीएल 2019 च्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच आयपीएलचे वेध लागले आहेत.

तसेच या आयपीएलमध्ये रोहित शर्मा, सुरेश रैना, एमएस धोनी आणि विराट कोहलीला 200 षटकार पूर्ण करण्याची संधी आहे. आत्तापर्यंत आयपीएलमध्ये एकाही भारतीय क्रिकेटपटूने 200 षटकार मारलेले नाही.

त्यामुळे आता रोहित, रैना, धोनी आणि विराट पैकी कोण आधी 200 षटकार पूर्ण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यांच्यापैकी जो कोणी प्रथम हा टप्पा पार करेल तो आयपीएलमध्ये 200 षटकार मारणारा पहिला भारतीय ठरणार आहे.

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत धोनीने 186, रैनाने 185, रोहितने 184 आणि विराटने 178 षटकार मारले आहेत.

तसेच आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पा फक्त आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला ओलांडता आला आहे. त्याने 112 सामन्यात 292 षटकार मारले आहेत. गेलला या आयपीएलमध्ये 300 षटकार पूर्ण करण्याचीही संधी आहे. असे जर झाले तर तो आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरेल.

त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा फलंदाज एबी डिविलियर्सलाही आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. त्यानेही धोनीप्रमाणेच आत्तापर्यंत 186 षटकार मारले आहेत.

आयपीएल 2019 च्या या मोसमात पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात एमए चिदम्बरम स्टेडीयम, चेन्नई येथे रंगणार आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

292 – ख्रिस गेल (112 सामने)

186 – एबी डिविलियर्स (141 सामने)

186 – एमएस धोनी (175 सामने)

185 – सुरेश रैना (176 सामने)

184 – रोहित शर्मा (173 सामने)

178 – विराट कोहली (163 सामने)

महत्त्वाच्या बातम्या-

अशी आहे विश्वचषक २०१९साठी अनिल कुंबळेची १५ सदस्यीय टीम इंडिया

अजिंक्य रहाणे म्हणतो, ती गोष्ट केली तर विश्वचषकासाठी संघातील स्थान पक्के…

आज गौतम गंभीरसह या चार खेळाडूंचा झाला पद्म पुरस्काराने सन्मान