IPL 2019: मुंबई इंडियन्सने रोहित शर्माबद्दल घेतला आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई | आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्सने या हंगामात संघात कायम केलेल्या तसेच मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे घोषीत केली आहेत. यात जे.पी. ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजूर रेहमान आणि अकिला धनंजयासारख्या मोठ्या खेळाडूंना मुंबईने करारातून मुक्त केले आहे.
दुसऱ्या बाजूला मुंबईची भिस्त ज्या दिग्गज खेळाडूंवर असते त्या रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, बेन कटींग आणि मिचेल मॅक्लेनघन मुंबईने २०१९च्या हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे.

आयपीएलच्या १२व्या हंगामासाठी मुंबईने एकूण १८ खेळाडूंना संघात कायम ठेवले असून १० खेळाडूंना करारातून मुक्त केले आहे. गेल्या हंगामात मुंबईच्या ताफ्यात तब्बल २८ खेळाडू होते.

१२व्या हंगामातही मुंबईचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू रोहित शर्माच मुंबईच नेतृत्व करेल हे यावरुन जवळपास निश्चित झालं आहे.

मुंबई इंडियन्सने १२व्या हंगामासाठी कायम केलेले १८ खेळाडू 

रोहित शर्मा,हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, अॅडम मिलने, जेसन बेहरनडॉर्फ.

 मुंबई इंडियन्सने १२व्या हंगामासाठी संघातून मुक्त केलेले १० खेळाडू  
सौरभ तिवारी, प्रदीप सांगवान, मोहसीन खान, एमडी. निधेश, शरद लुंबा, तेजिंदर सिंह धिल्लाँ, जे.पी. ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजूर रेहमान, अकिला धनंजया.
वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

IPL 2019: सनरायझर्स हैद्राबाद संघाने या ३ दिग्गज खेळाडूंना दिला संघातून डच्चू

युवराज सिंग फॅन्ससाठी ही आहे यावर्षातील सर्वात मोठी बातमी

का सचिनचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना भारतीयांना पाहता आला नव्हता?

रुट- कोहलीबरोबर घडला क्रिकेटमधील सर्वात वेगळा योगायोग

१६१ कसोटीत कूकला जे जमले नाही ते सॅम करनने ७ कसोटीत करुन दाखवले