आयपीएलमुळे टीम इंडियाची ही मालिका होणार रद्द?

आयपीएल 2019ला 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे. मात्र मार्च महिन्यात झिम्बाब्वेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यामध्ये एक कसोटी आणि 3 वन-डे सामने होणार आहेत. पण आयपीएलची तारीख स्पष्ट केली असून झिम्बाब्वे विरुद्धची मालिका रद्द होणार की पुढे ढकलली जाणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळत असून त्यातील शेवटचा सामना 18 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर भारत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून त्यात 5 वन-डे आणि 3 टी20 सामने होणार आहेत. यातील शेवटचा सामना 10 फेब्रुवारीला आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा संपला की ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये 24 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान 2 टी20 आणि 5 वन-डे सामने खेळणार आहेत. त्यानंतर लगेचच 10 दिवसानंतर आयपीएलच्या 12व्या हंगामाला सुरूवात होणार आहे.

क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, झिम्बाब्वे क्रिकेटचे व्यवस्थापक जिवेमोर मॅकोनी हे बीसीसीआयला भेटून कसोटी सामना रद्द करून टी20 आणि वन-डे सामने खेळवण्याबाबत चर्चा करणार आहे.

झिम्बाब्वे विरुद्धची ही वन-डे मालिका भारतीय संघासाठी विश्वचषकाच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. इंग्लंडमध्ये होणारा आयसीसी विश्वचषक 30 मे ते 14 जुलै पर्यंत खेळला जाणार आहे.

भारताने झिम्बाब्वे विरुद्ध शेवटचे तीन सामने आयसीसी स्पर्धेत खेळले आहेत. यामध्ये 2016चा टी20 विश्वचषक, 2011 आयसीसी विश्वचषक आणि 2006च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. तसेच भारताने 2002पासून झिम्बाब्वे विरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

होय, विश्वचषकासाठी धोनीबरोबर हा खेळाडू जाणार इंग्लंडला

त्या फलंदाजाच्या बाद होण्यावर उभा राहिला मोठा वाद, काय झाले नक्की?

खेलो इंडिया: महाराष्ट्राच्या २१ वर्षाखालील मुलीच्या कबड्डी संघाची विजयी सलामी, सोनाली व असावरीचे सुपरटेन