आयपीएल २०१९: हा संघ ठरणार विजेता, या दिग्गज माजी खेळाडूने वर्तवला अंदाज

आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होण्यासाठी आता दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे सर्वांना आयपीएलचे वेध लागले आहेत.

येत्या 23 मार्चपासून आयपीएल 2019 ला सुरुवात होणार आहे. या आयपीएल मोसमाचे पहिल्या दोन आठवड्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रंगणार आहे.

आयपीएलचा हा मोसम सुरु होण्याआधीच राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्नने दोन मोठे आंदाज वर्तवले आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करताना राजस्थान संघाला पांठिंबा देत हा संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. तसेच संजू सॅमसन हा या आयपीएल मोसमातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावेल असे म्हटले आहे.

त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की ‘मुंबईला परत येऊन आणि राजस्थान संघाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून गुलाबी जर्सी घालून चांगले वाटत आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी आता फक्त दोन आठवडे राहिले आहेत त्यामुळे उत्सुकता आहे. मला विश्वास आहे खेळाडू संघ म्हणून एकत्र चांगली कामगिरी करतील. आम्ही यावर्षी विजयाचे प्रबळ दावेदार आहे. तसेच मला वाटते की संजू सॅमसन या स्पर्धेतील सर्वात्तम खेळाडू ठरेल.’

राजस्थान संघाने 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या मोसमाचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर मात्र त्यांना पुन्हा हे विजेतेपद मिळवता आलेले नाही.

तसेच सॅमसनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 81 सामने खेळले असून 26.67 च्या सरासरीने 1867 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच मागील वर्षी त्याने 31.50 च्या सरासरीने 15 सामन्यात 441 धावा केल्या होत्या.

मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही आयपीएलमध्ये राजस्थान संघाच्या नेतृत्वाची धूरा अजिंक्य रहाणेकडे आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

या कारणामुळे कोहलीला सन्मानित करण्याचा निर्णय दिल्ली क्रिकेट असोसिएशनने केला रद्द

धोनीनेही सुरुवातीला केल्या आहेत चूका, पंतबरोबर होत असलेली तुलना अयोग्य…

टीम इंडियाची धुलाई करणारा टर्नर या संघाकडून गाजवणार आयपीएल