2019च्या आयपीएलमध्ये शिखर धवन खेळणार या संघाकडून

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन 2019मध्ये आयपीएलच्या (इंडीयन प्रीमियर लीग) दिल्ली डेयरडेविल्स या संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. यामुळे शिखर तब्बल 11 वर्षानंतर दिल्लीकडून खेळणार आहे.

सनरायजर्स हैद्राबादने त्याला 5.2 कोटी रूपयामध्ये संघात घेतले होते. मात्र 2018मध्ये झालेल्या लिलावत संघमालकाने त्याच्यासाठी राईट टू कार्ड (आरटीएम) वापरण्याची इच्छा दर्शवली नाही.

तसेच याआधी शिखर 2008मध्ये झालेल्या आयपीएलच्या हंगामात दिल्लीकडून खेळला होता. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. मग त्याला डेक्कन चार्जसने खरेदी केले. यावेळी संघाने नाव बदलले पण त्याला संघात कायम ठेवले होते. पण 2018पासून संघमालक त्याच्यावर नाराज आहे.

शिखरच्या बदल्यात हैद्राबादने दिल्लीकडून शाहबाज नदीम, विजय शंकर आणि अभिषेक शर्मा यांना संघात घेऊ शकतो. या तिघांची किंमत 6.95 कोटी असल्याने बाकी राहिलेली 1.75 कोटी रक्कम हैद्राबाद दिल्लीला परत देणार आहे.

आयपीएलमध्ये शिखरने हैद्राबादसाठी 91 डावात खेळताना 2768 धावा केल्या. यामध्ये त्याच्या मागील हंगामातील 497 धावांचा समावेश आहे. तसेच शिखर आणि डेविड वॉर्नर यांची सलामीची जोडी हैद्राबादसाठी आतापर्यंत यशस्वी ठरली आहे.

2019च्या आयपीएलचा लिलाव 16 डिसेंबरला होणार आहे. तसेच मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून (आरसीबी) क्विंटन डी कॉकला विकत घेतले असून यासाठी त्यांनी आर्थिक व्यवहारही केला आहे. तर आरसीबीने किंग्ज इलेवन पंजाबकडून मनदिप सिंगच्या बदल्यात मार्कस स्टोइनिसला घ्यायचे ठरवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा

या १४ वर्षीय क्रिकेटपटूची वादळी खेळी, चोपल्या नाबाद ५५६ धावा